• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

संचिता उगले मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट… दिग्दर्शकाचा खळबळजनक दावा, संचिताला मृत्यूपूर्वी…

June 16, 2026 by admin Leave a Comment


कुमकुम भाग्य फेम अभिनेत्री संचिता उगलेने 14 जून रोजी मुंबईच्या नालासोपारा परिसरातील आचोळे गावातील साई संतोषी बिल्डिंगमधील आपल्या घरी जीव दिला होता. ती अवघ्या 22 वर्षांची होती. तिच्या मृत्यूने चाहत्यांवर शोककळा पसरली होती. तिचा मृत्यूनंतर दोन व्हर्टिकल सीरिजमध्ये काम केलेले दिग्दर्शक सौमित्र सिंह यांनी न्यूज 9 डिजिटलशी बोलताना तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबाबत काही महत्त्वाचे खुलासे केले आहेत. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

संचिता उगलेला भास व्हायचे

सौमित्र सिंह यांनी सांगितले की, तिला शोमधून रिप्लेस करण्यात आले होते आणि तिच्या वैयक्तिक नातेसंबंधांचाही त्यावर परिणाम झाला. ब्रेकअपनंतर ती डिप्रेशनमध्ये गेली होती. त्याचा परिणाम तिच्या कामावर झाला आणि अखेर चॅनेलने तिच्या जागी दुसऱ्या कलाकाराला संधी दिली. ती अँटी-डिप्रेसंट औषधे घेत होती आणि तिला भास देखील होत होते. ही गोष्ट तिने माझ्या एका मित्राला सांगितली होती, ज्याने तिच्यासोबत काम केले होते. माझ्या चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यानही तिने याचा उल्लेख केला होता असा खळबळजनक दावा सौमित्र यांनी केला आहे.

सौमित्र यांनी पुढे बोलताना सांगितले की, ती एका ठिकाणी काम करत होती दुसऱ्या दिवशी तिला एका मॉक शूटसाठी जायचे होते. त्या शूटदरम्यान तिची भेट तिच्या एक्स प्रियकराशी झाली होती. त्यामुळे त्याच्यासोबत काम करण्यास तिने नकार दिला होता. संचिता सोबतच्या शेवटच्या भेटीवर बोलताना सौमित्र सिंह यांनी सांगितले की, ती खूप आनंदी दिसत होती आणि नेहमीप्रमाणे हसतमुख होती. चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये ती विनोद करत होती. मी नोव्हेंबरमध्ये तिच्यासोबत दोन व्हर्टिकल सीरिजमध्ये काम केले होते. ‘कृष्णा और चिट्टी’च्या शूटिंगदरम्यान आमची ओळख झाली. प्रीमियरच्या साधारण आठवडाभर आधीही आमच्यात संवाद झाला होता.”

सहकलाकारांनी काय म्हटले?

‘साजन घर’ मालिकेतील संचिता उगलेचा सहकलाकार उज्ज्वल शर्मा याने टेलिचक्करशी बोलताना दावा केला होता की, तिच्या मृत्यूमागे तिच्या माजी प्रियकरासोबत झालेले ब्रेकअप हे प्रमुख कारण होते. यानंतर संचिता उगलेची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री इंद्राक्षी कांजीलाल हिने आरोप केला की, उज्ज्वल शर्मा संचिता यांचा मानसिक छळ करत होता. हे आरोप फेटाळताना उज्ज्वल म्हणाला की, प्रत्यक्षात ती दुसऱ्याच व्यक्तीला डेट करत होती आणि माझ्यासोबतही राहत होती. ती रिलेशनशीपमुळे कठीण काळातून जात होती आणि त्यासाठी मदतही घेत होती.’

 



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • …तर 3 निष्पाप बाळांचा जीव वाचला असता! हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात काय घडलं? दुर्घटनेचं नेमकं कारण समोर
  • Dia Mirza: 500 पुरुषांसमोर काढावे लागले कपडे, दिया मिर्झाने सांगितला भयानक अनुभव
  • Govinda: जॉनी लिव्हरची मुलगी होणार गोविंदाची सून? व्हिडीओ पाहून शुभेच्छांचा वर्षाव, नेमकं काय खरं?
  • Kriti Sanon : भावाला काय बिकिनी घालून…, ट्रोल होणाऱ्या कृती सेनॉनवर महिला खासदाराने सधाला निशाणा, मॉर्डन कपड्यांचा वाद विकोपास
  • Khawadya Dongar : लग्नाच्या दुसऱ्या दिवशी… कुणालच्या वडिलांच बायको संगिताला नेमकं काय खटकलं? आत्याचा मोठा खुलासा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in