• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

श्रीलंकेत एन्ट्री घेताच टीम इंडियाने कमकुवत बाजूवर लक्ष केलं केंद्रीत, मालिका 2-0 ने जिंकण्याची तयारी सुरू

August 5, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. 15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ श्रीलंकेत दाखल झाला आहे. खरं तर भारतासाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. कारण या मालिकेत श्रीलंकेला 2-0 ने मात दिली तर अंतिम फेरीच्या आशा जिवंत राहतील. अन्यथा खूपच कठीण असणार आहे. त्यामुळे भारतीय संघाने सर्व उणीवा दूर करण्यासाठी कसून सराव सुरू केला आहे. इतकंच काय मागच्या काही सामन्यात अधोरेखित झालेल्या कमकुवत बाजू सुधारण्याचं काम सुरू केलं आहे. कोलंबोत दाखल झाल्यानंतर एनसीसी ग्राउंडवर सराव सुरू केला आहे. या मालिकेसाठी मैदानात उतरण्यापूर्वी गौतम गंभीरने फिल्डिंगवर फोकस केला आहे. कारण मागच्या काही सामन्यात आणि तिन्ही फॉर्मेटमध्ये भारताला गचाळ क्षेत्ररक्षणाचा आजार जडल्याचं जाणवत आहे.

कमकुवत फिल्डिंगवर काम सुरू

श्रीलंकेतील कोलंबो येथील एनसीसी मैदानातून भारतीय खेळाडूंचा एक फोटो समोर आला आहे. यात कर्णधार शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, ऋषभ पंत, ध्रुव जुरैल स्लिपला झेल पकडण्याचा सराव करताना दिसले. हे पाच खेळाडू स्लिप क्षेत्ररक्षण करणार आहेत. या ठिकाणी सर्वाधिक विकेट आणि झेल येतात. खासकरून वेगवान गोलंदाजाच्या गोलंदाजीवर बारीक लक्ष ठेवून क्षेत्ररक्षण करावं लागतं. एखादा झेल सुटला तर खूपच महाग पडू शकतं, याचा अंदाज आहे. नुकतंच टीम फिल्डिंग प्रशिक्षकपदी शुभदीप घोष यांची नियुक्ती झाली आहे.

Shubman Gill, KL Rahul, Yashasvi Jaiswal & Dhruv Jurel practicing Slip Catches 🔥[📸: RevSportz] pic.twitter.com/vJxcGXTTpn

— Johns. (@CricCrazyJohns) August 5, 2026

युके आणि झिम्बाब्वे दौऱ्यात 13 सामन्यात 21 झेल सोडले

भारतीय संघाचा नुकताच व्हाईट बॉल क्रिकेट दौरा झाला. या दौर्यांता भारताने आयर्लंड, इंग्लंड आणि झिम्बाब्वे विरुद्ध सामने खेळले. या 13 सामन्यात भारतायने 21 झेल सोडले. यात युकेत खेळलेल्या सामन्यात 11 झेल, तर झिम्बाब्वेविरुद्धच्या 3 सामन्यात 10 झेल सोडले. सर्वात वाईट म्हणजे या दौऱ्यात भारताने फक्त 4 झेल पकडले. इतकंच काय तर टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात 2-3 झेल सोडले होते. त्यावरून भारताचं क्षेत्ररक्षण किती सुमार आहे याचा अंदाज येतो. इंग्लंड कसोटी मालिकेतील पाच सामन्यात भारातने 23 झेल सोडले. यापैकी 13 झेल तर पहिल्या दोन कसोटीत सोडले होते. लीड्स कसोटीत सोडलेल्या 8 झेलपैकी चार झेल एकट्या यशस्वी जयस्वालने सोडले. तीन झेल तर स्लिपला सोडले आणि एक झेल आउटफिल्डवर सोडला.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • लॉन्च होताच ‘निसान’च्या ‘या’ नव्या एसयूव्हीचा धुमाकूळ; पहिल्याच महिन्यात क्रेटा आणि डस्टरचे टेन्शन वाढवले
  • PPF मध्ये 1000,5000 किंवा 10000 रुपये जमा केल्यावर किती परतावा मिळेल? कॅल्क्युलेशन जाणून घ्या
  • मुंबई पालिका आयुक्तांनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकारली, वंचितचा आरोप; माफीची मागणी!
  • तुमच्या हृदयासाठी कोणते तेल चांगले?, या 5 तेलांचा वापर ठरेल फायदेशीर
  • UPI आणि NEFT वापरणाऱ्यांनो सावधान! डिजिटल व्यवहारांवरही येऊ शकते इनकम टॅक्सची नोटीस

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in