• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

श्रीमंत उद्योजकाला बनायचं होतं हिरो, अभिनेत्रीचा मोठा कट; BMW मध्ये आढळले मृतदेहाचे तुकडे, तेव्हा नेमकं काय झालेलं?

July 20, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमध्ये घडलेल्या काही घटना जुन्या असल्या तरी, धक्कादायक घटनांची चर्चा कायम सुरु असते. 2012 मध्ये देखील अशीच एक घटना घडलेली, ज्यामुळे सर्वांमा मोठा धक्का बसलेला. 2012 मध्ये बॉलिवूडमध्ये स्वतःचं नाव मोठं करु पाहणाऱ्या करण कक्कड याची हत्या करण्यात आली. बॉलिवूडमध्ये निर्माता म्हणून ओळख निर्माण करण्याची इच्छा असलेल्या करण याची मोठा कट रचून हत्या करण्यात आली. सुरुवातील करण याला वाटलं की मिटिंगसाठी बोलावलं आहे. पण ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर करण परत घरी कधी परतलाच नाही. अखेर त्याच्या मृतदेहाची ओळख डीएनए चाचणी केल्यानंतर पटली…

करण कक्कड हत्याकांडात गँगस्टर विजय पालंडे, धनंजय शिंदे आणि मॉडल – अभिनेत्री सिमरन सूद यांचं नाव समोर आलं. सर्वात आधी सिमरन हिने करण याचा विश्वास संपादन केला आणि त्याला त्या फ्लॅटपर्यंत पोहोचवलं तिथे त्याची हत्या करण्यात आली. सांगायचं झालं तर, सिमरन हिला कळलं होतं की, करण श्रीमंत आणि यशस्वी उद्योजक आहे आणि त्याला बॉलिवूडमध्ये करियर करायचं आहे. यासाठी दिल्लीतून आलेल्या करण याने मुंबईत भाड्यावर फ्लॅट घेतला आणि एस सेकेंड हँड BMW घेतली. त्यानंतर करण नव्या प्रोजेक्टच्या शोधात गुंतला.

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिमरन हिने करण याच्यासोबत सर्वात आधी मैत्री केली आणि करण यासा आश्वसन दिलं की, इंडस्ट्रीतील मोठ्या व्यक्तींची ओळख करु देईल. अशात सिमरन हिने एका प्रोफेशनल मिटिंगचं कारण देत मिटिंगसाठी बोलावलं. पण असं काहीच नव्हतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लॅटमध्ये विजय पालंडे आणि त्याचा जोडीदार आधीच आलेले होते.

14 झोपेच्या गोळ्या आणि हत्या

पोलिसांनी सांगितल्यानुसार, आरोपींनी सर्वात आधी करण याला एका खोलीत बंद केलं. त्याचे बँक कार्ड आणि क्रेडिट कार्ड घेतले. करण याच्या खात्यातून पैसे काढले आणि दमदार खरेदी केली. जेव्हा त्यांना कळलं की, करण पुढे जाऊन आपल्याबद्दल पोलिसांना सर्वकाही सांगेल, तेव्हा त्याची हत्या करण्यात आली. आरोपींनी करण याला मरण्यासाठी दोन पर्याय दिले. शुद्धीत असताना स्वतःचाच गळा कापायचा आण झोपेच्या गोळ्या… अशात करण याने 14 झोपेच्या गोळ्या खाल्ल्या आणि आयुष्य संपवल… त्यानंतर करण याचा मृतदेह त्याच्याच BMW गाडीत भरण्यात आला आणि महाराष्ट्रातील एक निर्जन स्थळी फेकून दिला.

भावाने शोध सुरु केल्यानंतर समोर आलं धक्कादायक सत्य

करण याच्याबद्दल काहीच माहिती समोर येत नाही… असं कळताच कुटुंबियांनी शोध कार्य सुरु केलं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आल्यानुसार, करणच्या एटीएम कार्डचा कोणातरी वापर करत आहे . अशात पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज सोपवण्यात आली. सुरुवातील तपासात काही कळलं नाही. पण दिल्ली येथील उद्योजक टिक्कू याच्या हत्या प्रकरणात विजय पालंडे याला अटक करण्यात आली. त्यानंतर तपासाला वेग आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, पालंडेने दिलेल्या माहितीच्या आधारे कुंभारली घाटातून एक मानवी सांगाडा सापडला आणि डीएनए चाचणीद्वारे तो करण कक्कड याचा असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली. पण सिमरन सूद हिने तिच्यावर लागलेले सर्व आरोप फेटाळले. पण कोर्टाने तिने तीन वर्षांची शिक्षा सुनावली.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • चार महिन्यांत तुटलं लग्न; पती-सासूकडून मारहाण ? घरगुती हिंसाचाराच्या आरोपांवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन
  • अखेर मोठी बातमी धडकलीच ! लाडक्या बहिणांना मिळणार 40 हजार रुपये; थेट सपाचं कनेक्शन…
  • लढाऊ विमानांनाही असते ‘एक्सपायरी डेट’? किती वर्षे टिकते फायटर जेट, जाणून घ्या
  • IND vs SL : टीम इंडियाचा फॉलोऑन देण्याचा निर्णय चुकणार का? चौथ्या आणि पाचव्या दिवसाचं गणित काय?
  • Rohit Pawar : 40 लाख रुपयांना पेपर फोडला, रोहित पवार यांचा MPSC पेपर फुटीवर खळबळजनक दावा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in