• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शिवसेना शिंदे गटात येण्याची घोषणा करण्यापूर्वी नेमकं काय घडलं? ओमराजेंबाबत खळबळजनक माहिती समोर, रात्री दोन वाजता…

June 23, 2026 by admin Leave a Comment


शिवसेना ठाकरे गटाचे 5 बंडखोर खासदार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर देखील थोड्याच वेळात शिंदेंच्या निवासस्थानी पोहोचणार आहेत. त्यानंतर या सर्व खासदारांची पत्रकार परिषद होणार आहे. हे सर्व 6 बंडखोर खासदार आजच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. दोन दिवसांपूर्वी ओमराजे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढलं होतं. ऑपरेशन टायगर सक्सेसफूल होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मी अजूनही पक्ष प्रवेशाचा कोणताही निर्णय घेतलेला नाही, मी आधी माझ्या मतदारसंघात जाणार, कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आणी नंतरच निर्णय घेणार असं ओमराजे यांनी म्हटलं होतं.

दरम्यान त्यानंतर ते रविवारी धाराशिवमध्ये दाखल झाले, त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली.  त्यानंतर अखेर त्यांनी आपला निर्णय जाहीर केला, मी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. ओमराजे यांनी आपली भूमिका जाहीर करताच शिवसेना शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र ओमराजेंच्या पक्षप्रवेशापूर्वी अवघे काही तास आधीच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी ओमराजेंबाबत मोठा दावा केला आहे, कदम यांच्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.

नेमकं काय म्हणाले कदम? 

कदम यांनी ओमराजे निंबांळकरांबाबत मोठा दावा केला आहे. ऑपरेशन टायगर सक्सेस होऊ नये म्हणून ओमराजे निंबाळकर यांना रात्री दोन वाजता जाऊन गपचूप काही लोकांना भेटायचा प्रयत्न केला होता, पण त्यांनी ओमराजे यांना  चोख उत्तर देऊन टाकलं, असा खळबळजनक दावा कदम यांनी केला आहे. कदम यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान जे उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसतात तेच त्यांना फसवतात, 6 नाही तर सातव्या खासदाराची पन सही आहे. मी हे जबाबदारीने बोलतोय, त्याने मंत्री पद मागितलं ते मंत्रिपद मिळालं नाही, म्हणून तो वापस गेला आता तो खासदार उद्धव ठाकरेंच्या बाजुला बसत आहे, असा दावाही यावेळी कदम यांनी केला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इथं चिमुकले होरपळले अन् ते पाणीपुरी… तो व्हिडिओ दाखवत सुषमा अंधारे यांची चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जळजळीत टीका
  • जमिनीची कटकट संपली, आता तलावांवर तरंगणार सोलर पॅनेल; सूर्यास्तानंतरही मिळणार अखंड वीज पुरवठा
  • 1 लाख रुपयांचे कॅन्सरचे इंजेक्शन निघाले चक्क पाणी! काळ्या बाजाराचा धक्कादायक पर्दाफाश
  • Actor Life : त्यांना माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते, मुली तर…, पॉर्नस्टार झालेल्या अभिनेत्याला पश्चाताप
  • तणावविरहीत आयुष्यासाठी जपानी टेकनीक, या 4 गोष्टी फॉलो केल्यास सगळं टेन्शन पळूनच जाईल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in