• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘शिर्डी के साईबाबा’ फेम सुधीर दळवी यांच्या उपचाराचा लाखोंचा खर्च; अक्षय, रणबीर, कार्तिकसह भक्तांकडून मोठी मदत

September 3, 2026 by admin Leave a Comment


Sudhir Dalvi: ज्येष्ठ टीव्ही आणि चित्रपट अभिनेते सुधीर दळवी गेल्या काही महिन्यांपासून मृत्यूशी झुंज देत आहेत. ‘शिर्डी के साई बाबा’ या चित्रपटात साईबाबांची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले सुधीर दळवी गंभीर आजारपणामुळे रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्या उपचाराचा खर्च वाढत असताना बॉलिवूडमधील अनेक कलाकारांसह साईबाबांच्या भक्तांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला. 86 वर्षीय सुधीर आता हळूहळू बरे होत असून रुग्णालयातून घरी परतले आहेत. मात्र त्यांची प्रकृती अजूनही पूर्णपणे स्थिर नाही. ते वॉकरचा वापर करत आहेत. त्याचसोबत त्यांची मानसिक स्थितीही पूर्णपणे सुधारलेली नाही.

सुधीर दळवींना ऑक्टोबर 2025 मध्ये सेप्सिस या गंभीर संसर्गामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या आजाराचा त्यांच्या शरीरावर मोठा परिणाम झाला. त्यांच्या सांध्यांवरही परिणाम झाल्याने चालण्याची क्षमता कमी झाली आणि त्यांना बराच काळ अतिदक्षता विभागात उपचार घ्यावे लागले. त्यांच्यावरील उपचाराचा खर्च जवळपास 19 लाख रुपयांपर्यंत पोहोचला होता.

रुग्णालयातील वाढता खर्च पाहता त्यांच्या कुटुंबीयांसमोर आर्थिक अडचण निर्माण झाली. याची माहिती समोर आल्यानंतर इंडस्ट्रीतील अनेक कलाकार मदतीसाठी पुढे आले. सुधीर दळवी यांच्या पत्नी सुहास दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक आर्यन, रणबीर कपूर आणि अक्षय कुमार यांनी सुरुवातीच्या काळातच आर्थिक मदतीचा हात पुढे केला. त्यांच्याशिवाय आणखीही अनेक कलाकार आणि इंडस्ट्रीबाहेरील व्यक्तींनी मदत केली.

सुधीर दळवी यांची ओळख साईबाबांच्या भूमिकेमुळे विशेष आहे. त्यामुळे त्यांच्या आजारपणाची बातमी समजल्यानंतर देशभरातील अनेक साईभक्तही मदतीसाठी पुढे आले. त्यांच्या पत्नीने या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संकटाच्या काळात इतक्या लोकांनी मदतीचा हात पुढे केल्याने माणुसकीवरचा विश्वास आणखी दृढ झाल्याचं त्यांनी म्हटलं. याशिवाय शिर्डी साईबाबा संस्थान ट्रस्टनेही त्यांच्या उपचारासाठी 11 लाख रुपयांची मदत केली होती. डिसेंबर 2025 मध्ये या आर्थिक मदतीला परवानगी देण्यात आली होती.

सध्या सुधीर दळवी रुग्णालयातून घरी परतले आहेत. मात्र त्यांची प्रकृती पूर्णपणे पूर्वपदावर आलेली नाही. ते अजूनही वॉकरच्या मदतीने चालतात आणि त्यांच्या मानसिक स्थितीतही काहीसा गोंधळ असल्याचं पत्नीने सांगितलं. अभिनय क्षेत्रात तीन दशकांहून अधिक काळ काम केलेल्या सुधीर दळवींनी ‘रामायण’मध्ये गुरु वशिष्ठांची भूमिका साकारली होती. ‘शिर्डी के साई बाबा’मधील साईबाबांच्या भूमिकेने त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेला ज्याची भीती तेच रशियाने केले, मोठा दणका, थेट इराणला खतरनाक..
  • सर्वसामान्यांना महागाईच्या झळा अन्… GDP च्या कौतुक सोहळ्याविरोधात शरद पवार मैदानात, सरकारची काढली खरडपट्टी
  • स्वामी समर्थ मठातून पादुकांची चोरी, भाविकांमध्ये संतापाची लाट
  • Rain Alert: आनंदवार्ता! आकाशात काळ्या ढगांची शाळा, या जिल्ह्यांना पावसाचा तडाखा, 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट
  • Maharashtra News LIVE : मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील अश्लील टीका संतोष पंडितला भोवली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in