• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच… पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!

July 28, 2026 by admin Leave a Comment


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या दोन स्वतंत्र भेटींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील नेत्यांनी या भेटी वेगवेगळ्या कारणांसाठी झाल्याचे सांगितले असले, तरी राजकीय वर्तुळात विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.

राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह अमित शहा यांची भेट घेतली. १० ऑगस्ट रोजी दिल्लीत होणाऱ्या रेवती सुळे यांच्या रिसेप्शन सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी ही भेट झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खासदार बजरंग सोनवणे यांनी बीड मतदारसंघातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर मांडल्याचे स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही अमित शहा यांची स्वतंत्र भेट घेतली. या दोन्ही भेटींनंतर राज्यात नव्या राजकीय घडामोडींच्या चर्चांना वेग आला आहे. मात्र, संबंधित नेत्यांनी या भेटींना राजकीय स्वरूप नसल्याचे स्पष्ट केले असून, आगामी काळात या चर्चांवर काय पडदा उठतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शुटिंग दरम्यान न्यूड फुटेज कॅमेऱ्यात कैद, मानसिक तणावात अभिनेत्री, 21 व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल
  • Kisses on Car : गर्लफ्रेंडला कारवर 4 तासात 3400 वेळा किस करायला लावणं आदित्यला चांगलचं महाग पडलं, जे वाटलं नव्हतं ते घडलं
  • IND vs SL: फक्त फिल्डींगसाठी आला अन् चमत्कार करुन गेला, सर्फराज खान असं काही बोलला की श्रीलंकन बॅटर…Video Viral
  • यालाच म्हणतात मित्र, रशियाने भारताला दिले मोठे वचन, पुतिन यांचे थेट आश्वासन..
  • रोमँटिक सीनमध्ये त्याचा ताबा सुटला, नको तिथे चुकीचा स्पर्श केला; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in