• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

विद्यार्थ्यांसाठी ठाकरे बंधू पुन्हा एकत्र, थोड्याच वेळात संयुक्त पत्रकार परिषद… सरकारला फोडणार घाम?

July 23, 2026 by admin Leave a Comment


Raj Thackeray-Uddhav Thackeray on CJP Protest: दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाची धग आता देशभरात पोहचली आहे. सोमवारी आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यामुळे देशभरात असंतोषाची लाट उसळली आहे. विरोधकांनी या आंदोलनात उडी घेतली आहे. आंदोलकांच्या समर्थनार्थ विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इतर अनेक पक्षांचे नेते मैदानात उतरले आहेत. महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसेने एल्गार पुकारला आहे. थोड्याचवेळात उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद होत आहेत. यात ते आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याची शक्यता आहे. सरकारला घाम फोडणारी एखादी घोषणा होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

CJP चे आंदोलन पेटले

कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन पेटले आहे. गेल्या एक महिन्याहून अधिक काळापासून आंदोलन सुरू होते. सोनम वांगचुक यांना 20 जुलै रोजी आंदोलनस्थळावरून हटवल्यानंतर मोठा असंतोष पाहायला मिळाला. त्यानंतर सोमवारी पोलिसांनी विद्यार्थी, आंदोलकांवर लाठीहल्ला केला. देशभरात संतापाची लाट उसळली. सरकारच्या या कृतीचा निषेध करण्यात आला. आंदोलनस्थळी शरद पवार, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे यांच्यासह बड्या नेत्यांनी हजेरी दिली. आंदोलनाचे लोण देशभरात पोहचले. गेल्या दोन दिवसात तर काँग्रेसने देशातील विविध ठिकाणी आंदोलन करत सीजेपीला पाठिंबा दिला.

राज ठाकरे-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र

दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. सरकारची दडपडशाही सुरू आहे. देशात लोकशाहीच्या आडून हुकूमशाही लादली जात असल्याचा आरोप दोन्ही बंधुंनी केला आहे. काल राज ठाकरे आंदोलकांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. त्यावेळी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. उद्धव ठाकरे यांनीही जंतरमंतरवरून हे सरकार हटवण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आजच्या संयुक्त पत्रकार परिषदेत हे दोन्ही नेते कोणती मोठी घोषणा करतात. कोणते आंदोलन करणार याची चर्चा होत आहे.

ठाकरे बंधूंचा मोर्चा?

NEET पेपरफुटीप्रकरणात ठाकरे बंधूंकडून संयुक्त मोर्चा काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या दोन ते तीन दिवसात आंदोलनाची हाक देण्यात येऊ शकते. सीजेपीला महाराष्ट्रातून काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव सेनेचा मोठा पाठिंबा मिळाल्याचे दिसत आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर दोन्ही नेते ठाम असल्याचे समोर येत आहे. आजच्या पत्रकार परिषदेतून त्यांच्या आंदोलनाची अथवा मोर्चाची पुढील रणनीती समोर येईल. पण या निमित्ताने सीजेपीच्या आंदोलनाला मोठे बळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Gunratna Sadawarte : जरांगे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा माणूस, गुणरत्न सदावर्तेंचा गंभीर आरोप
  • Race 4 Movie Update : रेसमधून सलमान-सैफचा पत्ता कट ? चौथ्या पार्टमध्ये कोण दिसणार ?
  • तुकराम मुंढेंचा कारवाईचा धडाका! फूड लायसन्स एकदा रद्द झालं की परत मिळत नाही का? जाणून घ्या नियम
  • आदिवासी आंदोलक अण् अशोक उईकेंमध्ये खडाजंगी, नाशिकमध्ये वातावरण तापलं, जोरदार घोषणाबाजी
  • आता चिंताच मिटली, भारताला LPG साठी मिळाला नवा भिडू, मोठ्या प्रमाणावर आयात वाढणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in