
डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी आग्रही असलेले विद्यानंद बापट यांना नुकतीच पुण्यात मारहाण झाली. या घटनेनंतर त्यांच्या मूळ रत्नागिरी जिल्ह्यातील गोळप येथील आई-वडिलांनी त्यांची भूमिका आणि हल्ल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. वडील सुहास बापट आणि आई कल्पना बापट यांनी आपल्या मुलाच्या डीजेमुक्त गणेशोत्सवाच्या मागणीला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे.
सुहास बापट यांनी विद्यानंदच्या मागणीला योग्य ठरवत मारहाणीचा निषेध केला. डीजेमुळे सार्वजनिक जीवनात होणारा त्रास टाळण्यासाठी ही भूमिका आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कल्पना बापट यांनीही मारहाणीबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत, “अशी मारहाण नाही करायची. तो बोलतोय ना मग तुम्ही पण बोलायचं” अशी प्रतिक्रिया दिली. डीजेच्या आवाजामुळे त्यांच्या घरातील भांडी हलायची, हा अनुभव त्यांनी कथन केला. दोघांनीही विद्यानंदला पोलीस संरक्षण मिळायला हवे अशी मागणी केली आहे. टीव्ही नाईनच्या कॅमेरामॅनने मारहाण थांबवण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी नमूद केले. बापट कुटुंबीय विद्यानंदच्या भूमिकेमागे खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Leave a Reply