• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

BB20 : ऑलिम्पिक मेडलिस्ट, ६ वेळा वर्ल्ड चँपियन.. शोमध्ये होणार बॉक्सिंग क्वीनची एंट्री!

September 3, 2026 by admin Leave a Comment

‘दबंग’ स्टर अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan) ज्याचं सूत्रसंचालन करतो तो बहुचर्चित शो बिग बॉस (BB20 ) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. या शोच्या आगामी सीझनबद्दल बरेच अपडेट्सही समोर येत असून संभाव्य स्पर्धकांची नावांचीही चर्चा सुरू आहे. अनेक स्पर्धकांची नाव कन्फर्म झाल्याचंही सांगण्यात आलं आहे. ‘बिग बॉस 20’ लवकरच सुरू होणार आहे. याचदरम्यान आता या शोमध्ये सहभागी होणाऱ्यांच्या लिस्टमध्ये प्रसिद्ध बॉक्स मेरी कोम हिच्याही नावाची चर्चा आहे. तिचं नाव समोर येताच चाहत्यांचं कुतुहल वाढलं आहे. तिला या शोमध्ये पाहण्याची लोकांना प्रचंड उत्सुकता आहे. मेरी कोमचं या शोमध्ये येणं हे टीआरपीसाठी देखील गेमचेंजर साबित होऊ शकतं. जाणून घेऊया तिच्या आयुष्याबद्दल

१५ व्या वर्षी खेळासाठी सोडलं घर

मेरी कॉमचा जन्म 1 मार्च 1983 रोजी मणिपूरमधील एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणी शेतात काम करण्यासोबतच तिनं शिक्षणही घेतलं. त्यानंतर वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी तिने घर सोडून बॉक्सिंगचे प्रशिक्षण सुरू केलं. मेरी कोमने लहानपणापासूनच बॉक्सिंगसाठी खूप मेहनत घेतली आणि त्यासाठी दिवस-रात्र एक केले. वयाच्या 15व्या वर्षी तिने इम्फाळ स्पोर्ट्स अकादमीमध्ये प्रवेश घेतला. आज ती भारतातील सर्वात यशस्वी आणि प्रसिद्ध महिला बॉक्सर आहे. मेरी कोमच्या आयुष्यात आई-वडिलांव्यतिरिक्त तिचे पती ऑनलर कॉम यांचीही महत्त्वाची भूमिका होती. ते तिचा सर्वात मोठा आधारस्तंभ राहिलेत.

जागतिक रेकॉर्ड

मणिपूरचे बॉक्सर डिंग्को सिंग, ज्यांनी 1998 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं, त्यांच्याकडून मेरी कोमला प्रेरणा मिळाली आणि तिने बॉक्सर होण्याचा निर्णय घेतला. मेरी कॉम ही सहा वेळा म्हणजेच 2001, 2002, 2005, 2006, 2008, 2010 आणि 2018 मध्ये विश्व बॉक्सिंग चॅम्पियन बनणाऱ्या जगातील एकमेव महिला बॉक्सर आहे.

ऑलिंपिक मेडल्स

तसेच तिने २०१२ साली लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्य (Bronze) पडक जिंकत इतिहास रचला. ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे. ती आज संपूर्ण देशातील महिलांसाठी एक प्रेरणासतान आहे.

क्रीडा क्षेत्रातील तिच्या अभूतपूर्व योगदानासाठी भारत सरकारने तिला अर्जुन पुरस्कार , पद्मश्री , पद्मभूषण आणि राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार यांसारख्या पुरस्कारांनी सन्मानित केलं. तसेच ती 2016 ते 2022 या कालावधीत राज्यसभेची खासदारही होती.

तिने २००५ मध्ये फुटबॉलर करुंग ओनलर कॉम (Onler Kom) शी लगन केलं. त्यांना ४ मुलंही आहेत. २००७ साली जुळ्या मुलांचा, २०१३ साली एका मुलचा आणि २०१८ साली मुलीचा जन्म झाला.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IMD Weather Update : कोकण, मराठवाडा, विदर्भ… महाराष्ट्राच्या या भागाला पाऊस झोडपणार, हवामान खात्याचा अंदाज आला
  • Yasin Malik : मला मृत्यूदंड द्या! सरला भट प्रकरणातल्या यासीन भटची अजब मागणी, प्रतिज्ञापत्रात नेमकं काय?
  • Today Horoscope : 4 राशींना आयुष्यात सगळं मिळणार, स्वप्न होणार पूर्ण; वाचा राशीभविष्य काय?
  • EPF vs NPS: महिन्याला 10,000 रुपयांच्या गुंतवणूकीवर निवृत्तीनंतर कशात जास्त पैसा ?
  • आशिया कप स्पर्धेत स्मृती मंधानाचं झंझावाती शतक, एका झटक्यात दोन विश्वविक्रम मोडले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in