• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IMD Weather Update : कोकण, मराठवाडा, विदर्भ… महाराष्ट्राच्या या भागाला पाऊस झोडपणार, हवामान खात्याचा अंदाज आला

September 3, 2026 by admin Leave a Comment


देशभरात मान्सून सक्रिय असून अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. उत्तर प्रदेशसह विविध भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. अशातच आता भारतीय हवामान विभागाने उद्या म्हणजेच 4 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पूर्वोत्तर मध्य प्रदेश आणि आसपासच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याचा परिणाम अनेक राज्यांमध्ये पाहायला मिळत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. याशिवाय हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश तसेच पश्चिम आणि पूर्व राजस्थानमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेशात वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

मध्य भारतातही जोरदार पावसाचा अंदाज

मध्य भारतातील अनेक भागांतही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पूर्व मध्य प्रदेश आणि विदर्भाच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. छत्तीसगड तसेच पूर्व आणि पश्चिम मध्य प्रदेशात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पूर्व भारतातही पावसाचा जोर कायम राहणार आहे. अंदमान-निकोबार बेटे, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, गंगेच्या मैदानी भागातील पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ओडिशाच्या काही भागांतही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आसाम, मेघालयसह ईशान्य भारतात पावसाचा जोर

मान्सूनच्या काळात ईशान्य भारतातील राज्यांमध्येही जोरदार पाऊस होत आहे. उद्या अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्येही पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड आणि मणिपूरमध्ये विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील या भागांमध्येही पावसाचा इशारा

महाराष्ट्रातील कोकण आणि गोव्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. गुजरात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि सौराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. 4 सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे आणि विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! काँग्रेस आमदाराच्या घराबाहेर बॉम्बस्फोट, परिसरात खळबळ
  • 11 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, जरांगे यांचा अल्टीमेटम, आंदोलन सुरुच, काम झाले तर मुंबईत गुलाल उधळू
  • मनोज जरांगेंना मोठं यश, या 5 अटी मान्य; सरकारची थेट घोषणा!
  • IMD Weather Update : कोकण, मराठवाडा, विदर्भ… महाराष्ट्राच्या या भागाला पाऊस झोडपणार, हवामान खात्याचा अंदाज आला
  • Yasin Malik : मला मृत्यूदंड द्या! सरला भट प्रकरणातल्या यासीन भटची अजब मागणी, प्रतिज्ञापत्रात नेमकं काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in