• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

चक्क कानशिलातच लावून केलं प्रपोज, अभिनेत्री थेट… ‘त्या’ सीनसमोर कबीर सिंग चित्रपट फेल

September 3, 2026 by admin Leave a Comment


चित्रपटांमधील प्रेमळ सीन प्रेक्षकांच्या विशेष आवडीचे असतात, कारण अनेक चित्रपटांमधील प्रसंग प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवतात. विशेषतः प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतीबाबत बॉलिवूडमधील अनेक सीन आणि गाणी आजही चर्चेत असतात. मात्र, सध्या धर्मेंद्र आणि अनीता राज यांचा 43 वर्षे जुना एक सीन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा प्रसंग ‘नौकर बीवी का’ या चित्रपटातील आहे. या सीनमध्ये प्रेम व्यक्त करण्याची पद्धत पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. धर्मेंद्र आणि अनीता राज यांच्यातील या प्रसंगात एकमेकांना कानशिलात लगावत प्रेमाची कबुली दिली जाते.

सीनमध्ये धर्मेंद्र अनीता राज यांच्याकडून त्यांच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी सांगतात की त्यांचे लग्न एका फिल्म स्टारसोबत होणार आहे. ते म्हणतात, “संध्या से अच्छी बीवी मुझे मिल ही नहीं सकती। आप भी मेरी शादी में आइएगा.” हे ऐकल्यानंतर अनीता राज धर्मेंद्र यांच्या कानशिलात लगावतात. त्यानंतर धर्मेंद्र विचारतात, “इसका ये मतलब तो नहीं कि तुम मुझसे प्यार करने लगी हो?” अनीता राज नकार देतात, तेव्हा धर्मेंद्र त्यांना कानाखाली मारतात. यामुळे त्या बेडवर पडतात. रडत उठल्यानंतर त्या पुन्हा धर्मेंद्र यांना कानाखाली मारतात आणि त्यांना मिठी मारून आपल्या प्रेमाची कबुली देतात.

हा सीन व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यावर भन्नाट प्रतिक्रिया आणि मीम्स पाहायला मिळत आहेत. एका यूजरने लिहिले, “दूसरा चांटा खाने से पहले ही गले लगा लेना चाहिए था ना। वैसे ये प्रपोजल का तरीका भी अच्छा है।” दुसऱ्या यूजरने म्हटले, “कबीर सिंह कौन है, हम तो धर्मेंद्र के इस सीन के अलग लेवल फैन हो चुके हैं.” तर आणखी एका यूजरने लिहिले, “अगर प्रपोज ऐसे कर दिया लड़की को तो सारी जिंदगी कोई मिलेगी ही नहीं भाई।”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita (@classy_ankita09)

राजकुमार कोहली दिग्दर्शित या चित्रपटात रीना रॉय, विनोद मेहरा, राज बब्बर आणि ओम प्रकाश यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IMD Weather Update : कोकण, मराठवाडा, विदर्भ… महाराष्ट्राच्या या भागाला पाऊस झोडपणार, हवामान खात्याचा अंदाज आला
  • Yasin Malik : मला मृत्यूदंड द्या! सरला भट प्रकरणातल्या यासीन भटची अजब मागणी, प्रतिज्ञापत्रात नेमकं काय?
  • Today Horoscope : 4 राशींना आयुष्यात सगळं मिळणार, स्वप्न होणार पूर्ण; वाचा राशीभविष्य काय?
  • EPF vs NPS: महिन्याला 10,000 रुपयांच्या गुंतवणूकीवर निवृत्तीनंतर कशात जास्त पैसा ?
  • आशिया कप स्पर्धेत स्मृती मंधानाचं झंझावाती शतक, एका झटक्यात दोन विश्वविक्रम मोडले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in