• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लक्स साबणाची जाहिरात करणारी पहिली अभिनेत्री, 16 व्या वर्षी लग्न अन् 4 मुलांची आई, कोण आहे ही अभिनेत्री?

September 9, 2026 by admin Leave a Comment


अभिनयाच्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्याचं स्वप्न अनेकजण पाहतात. मात्र, परिस्थितीमुळे अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवून पुढे स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे कलाकार फार कमी असतात. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री लीला चिटणीस यांची कहाणीही अशीच संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी अभिनय क्षेत्रात स्वतःचं भक्कम स्थान निर्माण केलं.

लीला चिटणीस यांचा जन्म 9 सप्टेंबर 1909 रोजी कर्नाटकातील धारवाड येथे एका मराठी भाषिक ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचं माहेरचं नाव लीला नागरकर होतं. त्यांचे वडील इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक होते. महिलांच्या शिक्षणाला फारसं महत्त्व दिलं जात नसलेल्या त्या काळात लीलांनी आर्ट्समध्ये बी.ए. पदवी मिळवली. त्यामुळे त्यांचं नाव महाराष्ट्रातील सुरुवातीच्या पदवीधर महिलांमध्ये घेतलं जातं.

अवघ्या 16 व्या वर्षी लग्न

लीला यांचा विवाह अवघ्या 16 व्या वर्षी डॉ. गजानन यशवंत चिटणीस यांच्याशी झाला. या दाम्पत्याला चार मुलं झाली. मात्र पतीच्या व्यसनाधीनतेसह काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी निर्माण झाल्या आणि अखेर दोघांनी घटस्फोट घेतला.

घटस्फोटानंतर चार मुलांच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी लीलांवर आली. एकट्या आईच्या भूमिकेत मुलांचा सांभाळ करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सुरुवातीला त्यांनी शिक्षिकेची नोकरी केली. त्यानंतर ‘नाट्य मन्वंतर’ यांसारख्या नाट्यसंस्थांशी त्या जोडल्या गेल्या आणि याच माध्यमातून त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात झाली.

लक्स साबणाच्या जाहिरातीत झळकणाऱ्या पहिल्या अभिनेत्री

लीला चिटणीस यांच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे 1941 मध्ये त्यांनी लक्स साबणाच्या जाहिरातीत काम केलं. अशा प्रकारच्या जाहिरातीत झळकणाऱ्या त्या भारतीय सिनेसृष्टीतील सुरुवातीच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होत्या.

1930 च्या दशकापासून 1980 च्या दशकापर्यंत त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. तब्बल पाच दशकांहून अधिक काळ चाललेल्या कारकिर्दीत त्यांनी 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केल्याचं सांगितलं जातं.

चित्रपटसृष्टीतून निवृत्ती घेतल्यानंतर त्या अमेरिकेत आपल्या मुलासोबत राहत होत्या. 14 जुलै 2003 रोजी त्यांचं निधन झालं. मात्र संघर्षावर मात करत अभिनयाच्या क्षेत्रात स्वतःचं अढळ स्थान निर्माण करणाऱ्या लीला चिटणीस यांचा प्रवास भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासातील एक प्रेरणादायी अध्याय म्हणून कायम स्मरणात राहिला.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कियारा-सिद्धार्थचा भन्नाट ‘रेट्रो अवतार’; चाहत्यांना आठवली अक्षय-रवीना जोडी
  • Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने…
  • 400 हिट आणि 50 ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा भारतीय अभिनेता, ज्याच्या पुढे शाहरुख-अमिताभ बच्चन फेल
  • बँकेत जायची गरज नाही, आता थेट ATM मधून मिळेल नवीन डेबिट कार्ड, कशी आहे नवी व्यवस्था
  • Pakistan Mecca pact : मोठी बातमी, मित्र मार खातोय, वाचवण्यासाठी पाकिस्तान कुठल्याही क्षणी युद्धात उतरणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in