
बॉलिवूडचं लोकप्रिय जोडपं म्हणजे अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) .. त्यांचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावरही ते दोघे ॲक्टिव्ह असतात, चाहत्यांशी अनेक गोष्टी शेअर करतात. हीच कियारा आणि सिद्धार्थ जर 1980 च्या दशकातील बॉलिवूड कपल असते, तर ते कसे दिसले असते? एआयच्या एका व्हायरल ट्रेंडमुळे सोशल मीडियावरील लोकांना आता तशी कल्पना करण्याची संधी मिळत आहे. सेलिब्रिटी आणि नेटिझन्स रेट्रो काळातील फोटोंमध्ये आपला लूक पुन्हा तयार करत आहेत. या ट्रेंडला कियारानेही फॉलो केलं असून तिने तिचा आणि सिद्धार्थचा एक एआय फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही 80 च्या दशकातील स्टार्ससारखे दिसत आहेत.
कियाराने आज ( बुधवार, 9 सप्टेंबर) तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा अगदी 80च्या दशकातील हिरो-हिरोईनसारखे दिसतायंत. डबल डेनिम आउटफिट मध्ये सिद्धार्थ एकदम हँडसम दिसतोय. त्यासोबत त्याने डार्क एविएटर सनग्लासेस घातले . ज्यामुळे त्याचा लूक जुन्या काळातील बॉलिवूड हिरोसारखा वाटतोय.
तर दुसरीकडे, कियाराने गुलाबी रंगाचा पफ-स्लीव्ह ड्रेस, हूप इअररिंग्स आणि बांगड्या घालून फोटो शेअर केला. तिच्या या संपूर्ण लूकने 80-90 च्या दशकातील बॉलिवूड अभिनेत्रींची आठवण करून दिली. कियाराने हा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करताना त्यावर “80च्या दशकात परत” असंही लिहिलं. तसेच तिने सिद्धार्थच्या आगामी ‘द वन’ या चित्रपटातील रोमँटिक गाणे ‘समझो ना’ हे देखील याच फोटोसबत जोडलं होतं.
अक्षय कुमार आणि रवीना टंडनशी तुलना
कियारा- सिद्धार्थचा हा खास अंदाज त्यांच्या चाहत्यांना खूपच आवडला. तिच्या पोस्टवर भरभरून लाइक्स आणि कमेंट्स आल्या. अनेकांना तर त्या दोघांची ही जोडी पाहून अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांची गाजलेली जोडी आठवली. कियारा-सिद्धार्थचे हे फोटो सोशल मीडियावर खूपच वेगाने व्हायरल झाले. “काय शानदार कपल आहे” अशी कमेंट एकाने केली. तर “दोघेही त्यांच्या रेट्रो एरामध्ये.” असं आणखी एका चाहत्याने लिहीलं. एवढंच नव्हे तर एका युजरने तर कियारा आणि सिद्धार्थची तुलना अक्षय कुमार आणि रवीना टंडनच्या आयकॉनिक जोडीशी केली.

कधी झालं सिद्धार्थ- कियाराचं लग्न ?
7 फेब्रुवारी 2023 रोजी कियारा-सिद्धार्थने राज्साथनच्या जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये शाही अंदाजात विवाह केला. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओजची सोशल मीडियावर प्रचंड चर्चाही झाली. तर गेल्या वर्षी म्हणजे, जुलै 2025 रोजी या जोडप्याच्या घरी एका चिमुकल्या परीचं आगमन झालं. कियाराने गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र लेकीच्या जन्मानंतर दोघांनीही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बरीच गोपनीयता राखली आहे. सध्या कियारा आणि सिद्धार्थ आपल्या पालकत्वाचा आनंद घेत असून आपल्या छोट्या मुलीसोबत क्वालिटी टाइम घालवत आहेत. कामासोबतच दोघेही आपल्या कौटुंबिक आयुष्याचा समतोल साधताना दिसत आहेत.
अपकमिंग प्रोजेक्ट्स
कियारा अडवाणी ही नुकतीच गीतू मोहनदास यांच्या ‘टॉक्सिक: ए फेयरीटेल फॉर ग्रोन अप्स’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोब यश, नयनतारा, तारा सुतारिया, हुमा कुरेशी आणि रुक्मिणी वसंत हे कलाकारही होते. तर दुसरीकडे, सिद्धार्थ मल्होत्रा सध्या आपल्या आगामी ‘द वन’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत तमन्ना भाटिया, श्वेता तिवारी, सुनील ग्रोव्हर आणि मनीष पॉल हे कलाकारही दिसणार आहेत. हा चित्रपट 25 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.
Leave a Reply