• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2027: महेंद्रसिंह धोनीबाबत मोठा खुलासा! चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूने सांगितली आतली गोष्ट, नेमकं काय घडतंय?

September 9, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेच चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी निराशाजनक राहिली. या पर्वात महेंद्रसिंह धोनी दुखापतीमुळे खेळला नाही. आता आयपीएल 2027 पर्वात खेळणार की नाही, असा प्रश्न आहे. त्यात महेंद्रसिंह धोनीकडून पुढच्या पर्वात खेळण्याबाबत कोणतेही संकेत दिलेले नाहीत. त्यामुळे त्याचे चाहते संभ्रमात आहे. रोज काही ना काही बातमी समोर येत असल्याने संभ्रमाचं वातावरण आहे. असं असताना चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज आकाश मढवाल याने महेंद्रसिंह धोनी पुढच्या पर्वात खेळणार असा विश्वास व्यक्त केला आहे. आयपीएलच्या पुढच्या पर्वात खेळण्याचा निर्णय महेंद्रसिंह धोनी स्वत: करेल. पण धोनी ज्या पद्धतीने सराव करत आहे, ते पाहून असं दिसतंय की पुढच्या पर्वात खेळेल. आकाशच्या मते, सीएसके कँपमध्ये धोनी रूजू झाल्यापासून कोणताही सराव शिबिर सोडलेलं नाही. तो सलग फलंदाजी करत आहे आणि सरावात पू्र्ण मेहनत करत आहे. हे पाहूनच आकाशने हा अंदाज बांधला आहे.

धोनीच्या फिटनेसबाबत काय बोलला?

महेंद्रसिंह धोनीच्या तयारीबाबत आकाश मढवालने सांगितलं की, त्याचं फिटनेस पाहून पूर्ण विश्वास आहे की आयपीएल 2027 स्पर्धेत खेळेल. दरम्यान, महेंद्रसिंह धोनी खेळेल की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे. पण आकाश मढवालने त्याचं म्हणणं काय आहे ते मांडलं आहे. त्यामुळे त्याचं म्हणणं धोनीच्या चाहत्यांना दिलासा देणारं आहे. आकाशने संघात धोनीच्या वर्तनावरही भाष्य केलं. धोनी खूप शांत आहे आणि इतर खेळाडू त्याच्याशी सहज बोलू शकतात. कोणालाही काहीही अडचण असेल किंवा प्रश्न असेल तर ते धोनीचा थेट सल्ला घेऊ शकतात. धोनीसोबत ड्रेसिंग रूम शेअर करणं युवा खेळाडूंसाठी अनुभवाची शिदोरी आहे.

माजी क्रिकेटपटू सुब्रमण्यम बद्रीनाथने नुकताच खुलासा केला होता की, धोनीला केवळ ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून मैदानात उतरायचे नाही. जर तो खेळला, तर तो पूर्णवेळ यष्टिरक्षक-फलंदाज म्हणूनच खेळेल, अन्यथा तो खेळणार नाही. दरम्यान, धोनीने चेन्नई सुपर किंग्सला 2010, 2011, 2018, 2021 आणइ 2023 मध्ये आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले. आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून 130 हून अधिक सामने जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे. आयपीएलच्या इतिहासात संघाला 10 वेळा फायनलमध्ये आणि 14 पैकी 12 हंगामात प्ले-ऑफमध्ये पोहोचवण्याचा अभूतपूर्व विक्रम धोनीच्या नावावर आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 80s Photo Trend : 80s फोटो ट्रेंड सुपरहिट; पण फोटो बनवताना सावधान! ‘या’ चुका टाळा, नाही तर…
  • मोठी बातमी! ज्याची भीती होती तेच घडलं, इराणचा अमेरिकेला सर्वात मोठा झटका, आता ट्रम्प काय करणार? जगाचं लक्ष
  • नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज मनोज जरांगे यांच्या भेटीला, मोठ्या घडामोडी….
  • व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता…
  • Amruta Fadanvis : ते माझे भाऊ; अमृता फडणवीसांचं जरांगें पाटलांना जेवणाचं निमंत्रण

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in