• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रोहित शर्मा 2027चा वर्ल्ड कप खेळणार नाही? सोशल मीडियावरील त्या चर्चांमुळे धाकधूक वाढली

August 11, 2026 by admin Leave a Comment

रोहित शर्माने टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा संपल्यानंतर लगेचच या फॉर्मेटला रामराम ठोकला. त्यानंतर इंग्लंड कसोटी मालिकेपूर्वी रोहित शर्माने कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती घेतल्याचं जाहीर केलं. त्यामुळे रोहित शर्मा आता गेल्या काही दिवसांपासून फक्त वनडे फॉर्मेट खेळत आहे. गेल्या काही दिवसांपासून वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत खेळण्यासाठी जोरदार सरावही करत आहे. पण आता वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी सर्व काही ठीक होतं. पण इंग्लंड वनडे मालिकेतील दुसरा सामना संपला आणि त्याच्या निवृत्तीच्या बातम्यांचं पेव फुटलं. लॉर्ड्सवरील वनडे सामना त्याच्या क्रिकेट कारकि‍र्दीचा शेवटचा सामना असेल, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. तसेच मीडियातही या बातम्यांना जोर मिळाला. पण बीसीसीआयने या सर्व बातम्यांचं खंडन केलं. इतकं काय तर इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या वनडे सामन्यात शतकी खेळी करून टीकाकारांची तोंडही बंद केली होती.

सोशल मीडियावरचा दावा काय?

रोहित शर्मा वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा खेळणार की नाही अशी चर्चा गेल्या दिवसांपासून सुरूच आहे. पण आता सोशल मीडियावरील एक पोस्ट आणि ती पोस्ट वाऱ्याच्या वेगाने  शेअर होत असल्याने रोहित शर्माच्या चाहत्यांची धाकधूक वाढली आहे. या पोस्टमध्ये रोहित शर्मा वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा खेळणार नाही, दावा केला गेला आहे. त्याच्यासाठी निवृत्तीचा सामना आयोजिक केला जाईल असंही सांगितलं गेलं आहे. त्यामुळे यात किती तथ्य आहे, हे येत्या काळात स्पष्ट होईल. पण खरंच असं काही घडलं तर रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी ठरेल.

Rohit Sharma Will Not Play 2027 World Cup 💔

Sorry , But This Is Final 🙏🏻

📍 A Retirement Series Will Be Organised For Him 📍

— Vaibhav Bhola 🇮🇳 (@VibhuBhola) August 11, 2026

🚨 ROHIT SHARMA TO RETIRE BEFORE WORLD CUP 2027 🚨

“Rohit Sharma will not play 2027 World Cup. A retirement series will be organised for him.” (As per Vaibhav Bhola) 🤨

Question for Fans – Should Rohit Sharma play the World Cup 2027? YES or NO 🧐pic.twitter.com/RurhrzMOZO

— Ajay Jadeja (@AjayJadeja171) August 11, 2026

रोहित शर्माचं वनडे वर्ल्डकपचं स्वप्न भंगणार?

रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने 2023 वनडे वर्ल्डकप खेळला होता. एकही सामना न गमावता अंतिम फेरी गाठली होती. पण अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला आणि जेतेपदाचं स्वप्न भंगलं. आता हेच स्वप्न उराशी बाळगून वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेची तयारी करत होता. यासाठी त्याने फिटनेसवरही काम केलं होतं. पण आता सोशल मीडियावर रंगलेल्या चर्चांमुळे पुढे काय होतं? याकडे लक्ष लागून आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe: दहा दिशेला दहा तोंडं करून बसलोय, तुकाराम मुंढेंचा अधिकारी-कर्मचाऱ्यांना सज्जड दम; जीन्स-टीशर्टवरूनही सुनावलं
  • मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये श्रीमंतांची कोट्यवधींची गुंतवणूक; 10 लक्झरी प्रोजेक्ट्समध्ये 3,815 कोटींच्या घरांची विक्री
  • Govinda : गोविंदा – सुनीता यांच्या वादावर घरातल्याच सदस्याचं मोठं वक्तव्य, नेमकं सुरु तरी काय?
  • VIDEO : 10 बाय 10 ची रुम, नोटांनी भरलेल्या 30 बॅगा, महिला भिकाऱ्याच्या घरात इतका पैसा मिळाला, आकडा ऐकून थक्क व्हाल
  • Govinda: गोविंदा-सुनीताचा आणखी एक मोठा निर्णय; वैवाहिक आयुष्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in