• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ! पंतप्रधान आणि रोहित पवारांच्या संवादादरम्यानच…

August 11, 2026 by admin Leave a Comment


दिल्लीमध्ये रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या रिसेप्शन सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या चर्चेत आहेत.

या रिसेप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांसारखे प्रमुख नेते उपस्थित होते. याशिवाय सुळे आणि पवार कुटुंबातील सदस्यांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली.

रिसेप्शन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमदार रोहित पवार यांच्यात संवाद झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मोदी यांनी रोहित पवार यांच्या कामाबाबत विचारणा केली. तसेच रोहित पवार यांच्या पत्नी कुंती पवार यांच्याशीही त्यांनी संवाद साधला.

रोहित पवार आणि कुंती पवार यांच्यासोबत संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिश्किल अंदाजात रोहित पवार यांच्या कामाबाबत भाष्य केले. यावेळी त्यांनी कुंती पवार यांच्याशी बोलताना, “रोहित बहोत लढते हो कभी हसा तो करो” असा संवाद केला. या भेटीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात त्याची चर्चा सुरू झाली आहे. रिसेप्शनमधील या भेटीचे क्षण सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या रडारवर राज्यातील अंगणवाड्या, थेट आदेशाने टेन्शन वाढलं; या गोष्टींची तपासणी होणार!
  • Sharddha Kapoor : रस्त्यावर शॉपिंग, बिनधास्त हादडलं, श्रद्धा कपूर मुंबईच्या गल्लीबोळात भिर भिर भटकली; Video
  • काळंकुट्टं पाणी… काळाने मिठी मारावी असं दृश्य, ग्यिरोंग इमिग्रेशन सेंटर बघता बघता गेलं वाहून; Video
  • वैभव सूर्यवंशीला लागणार आणखी मोठी लॉटरी? माजी कर्णधारानेच सांगून टाकलं; कसोटी क्रिकेटमध्ये…
  • लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in