• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रितेश, इट्स डन ब्रो..; सलमान खानने ‘नोकरी धोक्यात’ म्हणताच नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस

August 3, 2026 by admin Leave a Comment


भाऊ सोहैल खानला पाठिंबा देण्यासाठी अभिनेता सलमान खान ‘अलायन्स’ या शोमध्ये पोहोचला आहे. या एपिसोडचं प्रीमिअर अद्याप झालं नसून त्याचा प्रोमो मात्र सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. या प्रोमोमध्ये सलमान त्याच्या ‘दबंग’ अंदाजात एण्ट्री करताना दिसून येत आहे. सलमानला पाहून शोमधील स्पर्धकसुद्धा खुश होतात. भाऊ सोहैलची विचारपूस केल्यानंतर तो इतर स्पर्धकांसोबत गप्पा मारतो. या संपूर्ण प्रोमोमध्ये तो अभिनेता रितेश देशमुखबद्दल जे एक वक्तव्य करतो, त्याचीच जोरदार चर्चा होत आहे. ‘रितेश देशमुखची नोकरी धोक्यात आहे असं दिसतंय’, असं सलमान म्हणतो. या एका वाक्यामुळे सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. रितेशने असं केलंय तरी काय, असा सवाल चाहते विचारत आहेत.

‘रितेशची नोकरी धोक्यात आहे, असं तो का म्हणाला? रितेशने काय केलं’, असा प्रश्न एकाने विचारला. तर ‘अलायन्स हा शो लॉक-अप 2 पेक्षा जास्त लोकप्रिय आहे, असं त्याला म्हणायचं असेल’, असा अंदाज दुसऱ्याने वर्तवला आहे. काहींनी ‘रितेश.. इट्स डन ब्रो’ म्हणत मस्करी केली आहे. सोनम वांगचूक यांच्या उपोषणाच्या वेळी सलमानने त्याच्या पोस्टमध्ये ‘सोनम.. इट्स डन ब्रो’ असं लिहिलं होतं.

पहा व्हिडीओ-

🚨 Salman Khan enters #AllianceOnPrime to support his brother Sohail Khan! 🔥

And that promo ending… did Salman just roast Ritesh Deshmukh? 😂 pic.twitter.com/Y62y9RDD6r

— BBTak (@BiggBoss_Tak) August 2, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

रितेश देशमुख सध्या ‘लॉक अप 2’ या शोचं सूत्रसंचालन करत आहे. तर अभिनेता कुणाल खेमू हा ‘अलायन्स’ या शोचं सूत्रसंचालन करत आहे. सलमानने रितेशच्या ‘लॉक अप 2’ या शोवर गंमतीने टोला लगावला आहे, असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. कारण ‘अलायन्स’ आणि ‘लॉक अप 2’ हे दोन्ही शोज जवळपास एकाच वेळी प्रदर्शित झाले. एक नेटफ्लिक्स तर दुसरा प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम होत आहे. सलमान आणि रितेश यांच्यात मैत्रीपूर्ण नातं आहे. परंतु दोन्ही शोज एकाच वेळी सोशल मीडियावर चर्चेत असल्यामुळे प्रेक्षकांचं अधिक लक्ष वेधण्यासाठी सलमानने हे वक्तव्य केलं असावं, असा अंदाज नेटकरी वर्तवत आहे.

सलमान खान आणि रितेश देशमुख यांची मैत्री सर्वश्रुत आहे. रितेशच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटात एखादी भूमिका देण्यासाठी खुद्द सलमानने आग्रह धरला होता. रितेशनेच याचा खुलासा केला होता. या चित्रपटात सलमानने जिवा महालाची भूमिका साकारली होती.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?
  • ज्याची भीती होती तेच घडलं, यशस्वी जयस्वालवर ICC ची मोठी कारवाई, करिअरवर लागला डाग
  • हिरव्यागर्द झाडीतून नागमोडी वळणं घेताना दिसली वंदेभारत एक्स्प्रेस, मनमोहक बर्ड आय व्यूह व्हिडीओ व्हायरल
  • महायुतीची ‘मैत्री राज्यात, पुण्यात नाही’, निधी वाटपावरून राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांकडे धाव, सुनील टिंगरेंचे पत्र
  • IND vs SL 2nd Test : ऋषभ पंतने शुबमन गिलचा रेकॉर्ड मोडला, या बाबतीत निघून गेला सर्वांच्या पुढे

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in