• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

राज्यावर दुहेरी संकट! हवामान विभागाचा थेट मोठा इशारा, तब्बल इतक्या जिल्ह्यांमध्ये..

May 23, 2026 by admin Leave a Comment


राज्यातील हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. कुठे पाऊस तर कुठे उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. विदर्भात सुर्य आग ओकत आहे. उष्णतेचा कहर झाला. ब्रह्यपुरीमध्ये यंदा राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. ब्रह्यपुरीत 47.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यात आजही उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आला. मागील दोन दिवसांपासून या तिन्ही जिल्ह्यात तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला.सोलापूर, धाराशिव, लातूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला. काल पुणे, पिंपरी चिंचवड या भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. मुंबईतही ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे.

भारतीय हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा कायम आहे. पुढील काही दिवस राज्यात तापमान चाळिशीपार राहण्याचा अंदाज आहे. शुक्रवारपर्यंत मुंबईत कोरडे वातावरण राहण्याची शक्यता. 24 मे पर्यंत मुंबईचे कमाल तापमान 33 अंशांच्या आसपास असेल. वातावरणातील आर्द्रता वाढल्याने मुंबईत उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत कोकणातील तापमान नियंत्रणात आहे.  राज्यातील अनेक भागांत तापमान 40 अंशांपेक्षा अधिक आहे. मुंबईत अद्याप मान्सूनपूर्व सरींची हजेरी नाही. केरळमध्ये पुढील आठवड्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता. मुंबईत भल्या पहाटे रिमझिम पावसाला सुरुवात झाली. मुंबईत ढगाळ वातावरण आहे. मुंबईच्या चर्चगेट, मंत्रालय परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.

येवला शहरात सलग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी लावली. उष्णतेपासून हैराण झालेल्या नागरिकांना वातावरण गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळाला. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरु असल्याने अक्षरशा वाहन चालकांना वाहनाची लाईट लावून वाहने चालवण्याची वेळ आली. रायगड जिल्ह्यात माणगाव, लोणारे आणि इंदापूर परिसरात पावसाच्या हलक्या सरी; उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • होम लोन घेताना केवळ व्याजदर पाहू नका; ‘हा’ एक छुपा फॅक्टर वाढवू शकतो तुमचा एकूण खर्च
  • पहिलाच चित्रपट अन् रातोरात झाला स्टार, अचानक झाला इंडस्ट्रीमधून गायब, उडालेली मृत्यूची अफवा
  • लखनऊ अग्निकांड : मृतांचा आकडा १५ झाला, इमारतीवरुन उडी मारणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय झाले ?
  • घरातील सुकलेली रोपं देतात अशुभ संकेत, जाणून घ्या योग्य दिशा आणि वास्तुशास्त्राचे नियम
  • व्यायाम करताना जास्त घाम येणे, म्हणजे जास्त फॅट बर्न होते का ? तज्ज्ञांचे मत काय ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in