
आजकालचे शेतकरी पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेतीचा मार्ग अवलंबत जास्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी शेतकरी आपल्या पिकांमध्येही बदल करत आहेत. शेतकऱ्यांना लाखोंचा फायदा करून देणाऱ्या अशाच एका झाडाची शेती शेतकरी करू शकतात.
या झाडाचे नाव आहे पानफुटी. पानफुटी या झाडाला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. वेगवेगळ्या आजारांवर उपचार करण्यासाठी या झाडाची पाने खूप उपयोगी पडतात. म्हणूनच अनेक आयुर्वेदिक कंपन्यांमध्ये या झाडाच्या पानांना खूप महत्त्व आहे.
शेतकरी या झाडांची शेती करून लाखो रुपये कमवू शकतात. विशेष म्हणजे या झाडांची शेती करायची असेल तर तुम्हाला जास्त खर्चही येत नाही. अगदी कमी पाण्यात या झाडांची शेती केली जाऊ शकते. फवारणी किंवा इतर तत्सम खर्चदेखील खूप कमी असतो.
तुम्ही एकदा या झाडाचे रोप लावले तर पुढच्या दोन ते तीन महिन्यात हे झाड विकता येऊ शकते. या झाडाला रोज चार ते पाच तास उन भेटले पाहिजे. रेताड मातीमध्ये हे झाड चांगल्या पद्धतीने उगवते. पानफुटीचे एक झाड 25 ते 30 रुपयांना विकते.
तुमच्या शेतामध्ये हे झाड वाढू शकते का याची तपासणी करूनच ही शेती करायची की नाही हे ठरवावे. (टीप- ही स्टोरी प्राथमिक माहितीवर आधारलेली आहे. कोणताही प्रयोग करताना त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)




Leave a Reply