• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

यंदा कोकणची ट्रिप एकदम फ्री, गणेशोत्सवासाठी धावणार खास एक्स्प्रेस, तारीख काय? टाईमटेबल काय?

August 13, 2026 by admin Leave a Comment


कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी यंदाही शिवसेना एक्सप्रेस धावणार आहे. शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कोकणवासीयांसाठी खास भेट देण्यात आली आहे. भाविकांना शिवसेना एक्सप्रेसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. 12 सप्टेंबरला दादर ते कुडाळ पर्यत शिवसेना एक्सप्रेस धावेल. आमदार निलेश राणे यांनी ही घोषणा केली आहे.

कोकणताील गणेशोत्सव जगभरात प्रसिद्ध आहे. या काळात मुंबईसह जगभरातील कोकणवासीय आवर्जून त्यांच्या गावी येतात. यामुळे रेल्वेवर मोठी गर्दी होते. ही गर्दी पाहता रेल्वे प्रशासनही विशेष रेल्वे गाड्या सोडते. तर कोकणात जाताना अतिरिक्त थांबे घ्यावेत अशी मागणी करण्यात येते. ही मागणी रेल्वे प्रशासनाने मान्य केली आहे.

तर सालाबादप्रमाणे यंदाही मुंबईहून कोकणात जाणारी “शिवसेना एक्सप्रेस” विशेष रेल्वेगाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. याविषयीची माहिती शिवसेना आमदार निलेश राणे यांनी दिली. ही विशेष रेल्वे 12 सप्टेंबर शनिवारी सकाळी 10 वाजता दादर रेल्वे स्थानकावरून प्रस्थान करेल. ती कुडाळ रेल्वे स्थानकादरम्यान धावेल.

या रेल्वेत सीट बुकिंगसाठी आमदार निलेश राणे यांच्या कार्यालयाने संपर्क क्रमांकही जाहीर केला आहे. या क्रमांकावर कोकणात जाणारे भाविक सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेदरम्यान संपर्क साधू शकतात. सोमवार ते शनिवार या कालावधीत भाविक संबंधित क्रमांकावर संपर्क साधू शकतील. त्यांना या काळात रेल्वेतील सीट बुकिंगविषयीची इत्यंभूत माहिती देण्यात येईल.

कोकणातील गणेशोत्सवासाठी शिवसेना एक्सप्रेसचा प्रवास पूर्णपणे मोफत आहे. या रेल्वेसाठी कुणालाही कुठला मोबदला देऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. या रेल्वेचे बुकिंग अहस्तांतरणीय आहे. त्यामुळे बुकिंग करताना इतर प्रवाशांच्या नावावर कुणाला प्रवास करता येणार नाही. प्रवासासाठी सरकारी ओळखपत्र अनिवार्य आहे.

कोकणात जाऊन आपल्या कुटुंबियांना भेटता यावं आणि गणपती सण साजरा करता यावा म्हणून आमचा दरवर्षी हा छोटासा प्रयत्न असतो, असे कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी म्हटलं आहे. ही रेल्वे भाविकांसाठी एक चांगली संधी आहे. त्यांचा संपूर्ण प्रवास मोफत होणार आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Egg Price Hike : आता खाण्याचेही वांदे… साखर, कांद्यानंतर अंड्याचे भाव वाढले, झटक्यात इतके झाले भाव?
  • याला म्हणतात luxurious! चाकणकरांची कोट्यवधींची गुंतवणूक; 20,000 चौ. किमीचे आलीशान हॉटेल
  • मला नाही अब्रू आणि मी कशाला घाबरू… रूपाली चाकणकर यांच्यावर भडकल्या या नेत्या..
  • जगात खळबळ! अमेरिकेने घेतला व्हिसाबद्दल अत्यंत धक्कादायक निर्णय, थेट नियोजित..
  • Khavdya Dongar: वडिलांनी घर सोडलं अन् कुणाल पार खचला, मानसिक धक्क्यामुळे…अखेर ‘ते’ सत्य आलंच समोर..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in