• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोदींच्या निवासस्थानाबाहेर… इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!

July 26, 2026 by admin Leave a Comment


केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी आंदोलनाच्या स्वरूपावरही प्रश्न उपस्थित केले. तसेच या विषयावर त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना आणि भावनांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राधान्य दिले आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. विद्यार्थ्यांचे दिल्लीतील आंदोलन हे अराजकीय होते, मात्र काही लोकांनी त्याला राजकीय वळण दिले, असा आरोपही त्यांनी केला.

एकनाथ शिंदे म्हणाले, “काही लोकांनी आंदोलनात उडी घेतली. परंतु दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर न जाता काही लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी गेले. पंतप्रधानांचे निवासस्थानाचा परिसर हा उच्च सुरक्षेचा असतो. स्वर्गीय इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर SPG कायदा करण्यात आला. तेव्हापासून पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या परिसरात कोणतेही आंदोलन करता येत नाही.”

ते पुढे म्हणाले, “देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना याबाबत कल्पना होती. तरीदेखील जाणीवपूर्वक तिथे आंदोलन करण्यात आले. हजारो, लाखो लोकांना तिथे बोलावण्यात आले. पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी घातपात घडवून आणण्याचा राहुल गांधी यांचा प्रयत्न होता का?”



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग… सुषमा अंधारे संतापल्या
  • अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आग प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी संजय काटकरांना खडसावले
  • Khawdya Dongar tragedy : खवड्या डोंगर प्रकरणात मोठी अपडेट… अखेर मावस बहिणीने सर्वच सांगितलं, थेट म्हणाली..
  • MPSC पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, थेट अपर सचिवांना अटक; धक्कादायक खुलासे होणार?
  • Nepal Flood: नेपाळमध्ये पूराचा हाहाकार, गावची गावं वाहून गेली, पत्त्यांप्रमाणे कोसळल्या इमारती, धडकी भरवणारे व्हिडीओ समोर!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in