• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठ्या घडामोडी… एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीआधीच… काय घडतंय?

September 1, 2026 by admin Leave a Comment


राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी तातडीने दिल्लीला रवाना होणार आहेत. कॅबिनेटची बैठक सोडून शिंदे दिल्लीला जाणार असल्याने पडद्यामागे काय घडतंय अशी चर्चा रंगली आहे. उद्या 2 सप्टेंबर पासून सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे हे दिल्लीत जात आहेत. यावेळी ते शिवसेनेचे सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञांशी चर्चा करणार आहेत. तसेच काही मुद्देही त्यांच्यासमोर मांडणार आहेत, अशी माहिती आहेत. तसेच शिंदे दिल्लीत काही नेत्यांच्या भेटीगाठी घेण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात उद्या 2 सप्टेंबरपासून पुन्हा सुनावणीला सुरुवात होणार आहे. दोन आठड्यापूर्वी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला होता. 9 दिवस हा युक्तिवाद सुरू होता. ठाकरे गटाचा हा युक्तिवाद संपला आहे. या युक्तिवादात ठाकरे गटाने अनेक मुद्दे कोर्टात उपस्थित केले आहेत. अपात्रतेचा मुद्दा, निवडणूक आयोगाचा आणि विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आदी मुद्द्यांवर कोर्टात युक्तिवाद करण्यात आला होता. आता उद्यापासून शिंदे गटाच्या वकिलाचा युक्तिवाद होणार आहे. शिंदे गटाच्या वकिलांना ठाकरे गटाच्या वकिलाचा युक्तिवाद खोडून काढताचा कायदेशीर बाजू मांडत आपली बाजू कशी भक्कम आणि खरी आहे, हे दाखवावे लागणार आहे. त्यासाठी काही पुरावेही कोर्टात सादर करावे लागणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

आजच येणार की थांबणार?

या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले आहेत. यावेळी ते वकिलांशी चर्चा करून कायदेशीर बाबी समजून घेणार आहेत. तसेच शिवसेना फुटीपासूनचा घटनाक्रम आणि तत्कालिन परिस्थिती यावरही शिंदे वकिलांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच वकिलांकडून शिंदेंकडून काही माहिती घेण्यात येणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. त्यामुळेच शिंदे यांचा आजचा दिल्ली दौरा हा महत्त्वाचा मानला जात आहे. शिंदे वकिलांशी चर्चा करून आजच मुंबईला येणार की उद्यापर्यंत दिल्लीत थांबणार? याची माहिती मिळालेली नाही. त्यामुळे शिंदे यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी

दरम्यान, आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन, ओबीसींचा मोर्चा, गणेशोत्सव आणि पावसाचं घटतं प्रमाण यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय होण्याचीही शक्यता आहे. मात्र, शिंदे या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं सांगितलं जात आहे. दिल्लीत जाणं अत्यंत महत्त्वाचं असल्याने शिंदे कॅबिनेटला दांडी मारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • गुड न्यूज… सरकारी कर्मचाऱ्यांना 7 हजाराऐवजी मिळणार 21 हजार बोनस?
  • Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणे यांनी तडकाफडकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट, कारण काय?
  • 45 वर्षांची ही अभिनेत्री दिसते 25 च्या तरुणींसारखी, सौंदर्यात बॉलिवूड अभिनेत्रींना देते टक्कर, नवीन लुक थक्क करणारा
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी SCO समिट बैठकीत पाकिस्तानवर गरजले! भाषणातले 10 मुद्दे एका क्लिकवर
  • पाण्याची बॉटल किती दिवसांनी धुतली पाहिजे?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in