• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! शिवसेनेच्या बड्या नेत्याच्या जवळच्या व्यक्तीला अटक, माजी खासदारावरही गुन्हा दाखल

May 27, 2026 by admin Leave a Comment


राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. देवगिरी बँक फसवणूक प्रकरणात शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार उन्मेष पाटील यांचे नातेवाईक प्रशांत वाघ यांना अटक करण्यात आला आहे. या कारवाईमुळे चाळीसगावसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 5.33 कोटींच्या बँक फसवणूक प्रकरणी सहा महिन्यांपूर्वी माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता आर्थिक गुन्हे शाखेने सापळा रचून प्रशांत वाघ यांना चाळीसगावातून केली अटक आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

उन्मेष पाटील यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या चाळीसगाव शाखेची तब्बल 5 कोटी 33 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फरार असलेला संशयित आरोपी प्रशांत वाघ याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नावावरील औद्योगिक कर्ज थकीत झाल्यानंतर बँकेत गहाण असलेली मशिनरी संगनमताने विकल्याचा आरोप आहे. या व्यवहारामुळे बँकेचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

प्रशांत वाघ यांना अटक

चाळीसगाव शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे प्रशांत वाघ यांना ताब्यात घेत आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवले. न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान प्रशांत वाघ शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा माजी खासदार उन्मेष पाटील यांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे या घटनेने चाळीसगावसह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या अटकमुळे उन्मेश पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता

प्रशांत वाघ हे माजी खासदार उन्मेष पाटील यांचे नातेवाईक असल्याने या प्रकरणाला अधिक राजकीय रंग चढला आहे. आर्थिक गुन्हे शाखा आता मशिनरी विक्रीची प्रक्रिया आणि संबंधित व्यक्तींमधील आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उन्मेष पाटील यांत्यासह प्रशांत वाघ आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe: दहा दिशेला दहा तोंडं करून बसलोय, तुकाराम मुंढेंचा अधिकारी-कर्मचाऱ्यांना सज्जड दम; जीन्स-टीशर्टवरूनही सुनावलं
  • मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये श्रीमंतांची कोट्यवधींची गुंतवणूक; 10 लक्झरी प्रोजेक्ट्समध्ये 3,815 कोटींच्या घरांची विक्री
  • Govinda : गोविंदा – सुनीता यांच्या वादावर घरातल्याच सदस्याचं मोठं वक्तव्य, नेमकं सुरु तरी काय?
  • VIDEO : 10 बाय 10 ची रुम, नोटांनी भरलेल्या 30 बॅगा, महिला भिकाऱ्याच्या घरात इतका पैसा मिळाला, आकडा ऐकून थक्क व्हाल
  • Govinda: गोविंदा-सुनीताचा आणखी एक मोठा निर्णय; वैवाहिक आयुष्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in