• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! शिवसेनेचं टेन्शन मिटलं, नाशिक विधान परिषद निवडणुकीतील बंड रोखण्यात महायुतीला यश, गोकुळ गितेंचा दराडेंना पाठिंबा?

June 10, 2026 by admin Leave a Comment


राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.  17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. नाशिक विधान परिषदेची निवडणूक चांगलीच चर्चेत असून, या जागेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी सर्वात आधी भाजपकडून गणेश गिते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सोबतच त्यांचे बंधू गोकुळ गिते यांनी देखील अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र त्यानंतर महायुतीमध्ये ही जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आली. नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून नरेंद्र दराडे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली. दरम्यान त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गणेश गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

परंतु जरी गणेश गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी दुसरीकडे मात्र गोकुळ गीते यांनी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत, आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला होता. गोकुळ गीते यांच्या बंडखोरीचा मोठा फटका हा नरेंद्र दराडे यांना बसण्याची शक्यता होती. गोकुळ गीते यांनी नरेंद्र दराडे यांना पाठिंबा द्यावा, यासाठी सातत्याने भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन तसेच शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्याकडून प्रयत्न सुरू होते. अखेर समोर आलेल्या माहितीनुसार गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्या प्रयत्नाला आता यश आलं आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोकुळ गिते हे आता नाशिकमध्ये नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देणार आहेत. गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.  नाशिकच्या जागेवर तोडगा निघाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. दरम्यान आता नाशिकमधील बंडखोरी रोखण्यात यश आल्यानं शिवसेना शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाल्याचं दिसून येत आहे. गीते यांनी पाठिंबा दिल्यानं दराडे यांचा विधान परिषद निवडणुकीचा मार्ग आता मोकळा होणार आहे. शिवसेनेसोबतच दराडे यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ठाकरे गटातून बंडखोरी केलेल्या या खासदारावर एकनाथ शिंदे नाराज, थेट सर्व खासदार आणि आमदारांना..
  • 90च्या दशकातील ते गाणे…थेट पंतप्रधानांनीच तयार करण्याचे दिले होते आदेश, गल्ली-गल्लीत वाजलं, आज ही टॉप ट्रेंडमध्ये
  • ओमराजे आणि जगजितसिंह पाटीलांमध्ये Cold War? दोन पोस्ट अन् दोन्हीमध्ये शिंदेंचा फोटो, पुढे…
  • नसरापूर प्रकरणात मोठी अपडेट, आरोपी भीमराव कांबळे दोषी, न्यायालयात काय घडले?
  • सियाचा बॉयफ्रेंडसोबत लग्नाचा हट्ट, कुटुंबियांनी दिला फक्त या कारणामुळे नकार, मोठा खुलासा..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in