• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! मंत्रिपद न मिळाल्याने 2 आमदारांचा राजीनामा, राजकारणात खळबळ

August 3, 2026 by admin Leave a Comment


महाराष्ट्राच्या शेजारील राज्य कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आज मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यानंतर पक्षातील नाराजी समोर आली आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने काँग्रेसच्या दोन आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देणाऱ्या आमदारांमध्ये विजयपूरा जिल्ह्यातील इंडी मतदारसंघाचे आमदार यशवंत रायगौडा व्ही पाटील आणि सागर मतदारसंघाचे आमदार बेलूर गोपालकृष्णा यांचा समावेश आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अनेक आमदार नाराज

सोमवारी कर्नाटक सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पडला. यावेळी 19 मंत्र्यांचा शपथनिधी पार पडला. या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने अनेक आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. पक्षासाठी दीर्घकाळ काम करूनही आणि वरिष्ठ असूनही मंत्रिपदाची संधी न मिळाल्याची भावना अनेक आमदारांनी व्यक्त केली आहे. याच नाराजीतून दोन्ही आमदारांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. आता आगामी काळात हे दोन्ही नेते नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कर्नाटक मंत्रिमंडळात शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची नावे

आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात पी. एम. नरेंद्रस्वामी, शिवराज तंगडगी, रुद्रप्पा लमाणी, के. एस. बसवनथप्पा, बी. नागेंद्र, टी. रघुमूर्ती, बी. झेड. जमीर अहमद खान, रिजवान अरशद, संतोष लाड, मधु बंगारप्पा, पुत्तरंगशेट्टी, मंकळा वैद्य, अजय सिंह, एन. चालुवराया स्वामी, के. एम. शिवलिंगे गौडा, एच. सी. बालकृष्ण, बसवराज रायरेड्डी, विजयानंद काशप्पनावर, लक्ष्मण सावदी या आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर कर्नाटकातील काँग्रेस हायकमांडने विधानसभा आणि विधानपरिषदेतील सभापतींच्या नावांचीही घोषणा केली आहे. जी. एस. पाटील हे विधानसभा अध्यक्ष असणार आहेत, तर ए. एस. पोनण्णा उपाध्यक्ष असतील. त्याचबरोबर सलीम अहमद विधानपरिषदेचे सभापती असणार आहेत. तर उमाश्री या उपसभापती असणार आहेत. डीके शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील ही टीम आता कर्नाटकच्या विकासासाठी कटिबद्ध असणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रॉयल एनफील्डचा धमाका! आयकॉनिक Continental GT 650 नवीन फीचर्ससह लाँच; जाणून घ्या किंमत
  • पाय बांधले, डोक्यावर वार.. NEET विद्यार्थिनीच्या हत्येने शहर हादरलं; पोस्टमॉर्टम रिपोर्टने उडवली खळबळ
  • आता इराणला हरवणे अशक्य ? अमेरिकेशी युद्ध सुरु असताना इराणला गवसला मोठा खजाना…
  • मोठा दणका! मुंबईत मंत्र्यांच्या फ्लॅटवर थेट कारवाई, उच्चभ्रू टॉवरमधील 128 फ्लॅटवर हतोडा?
  • भाजपच्या सर्वात ताकदवर संसदीय समितीत फडणवीसांची एंट्री? दिल्ली वाऱ्या वाढल्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in