• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! थरकाप उडवणारा अपघात, अंगावर पडलं उकळतं स्टील, 8 मजूरांचा दुर्दैवी अंत

June 8, 2026 by admin Leave a Comment


आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम मधून थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. एका स्टील प्लांटमध्ये भीषण अपघात झाला असून अंगावर उकळतं स्टील पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक कर्मचारी जखमी झाले आहेत. प्लांटच्या एसएमएस-2 आणि एसटीसी-3 हीट फॅसिलिटीमध्ये मोठ्या प्रमाणात वितळलेल्या स्टीलची गळती झाल्याने हा भीषण अपघात झाला आहे.

वितळलेले स्टील असणारे भांडे फुटले…

समोर आलेल्या माहितीनुसार, उच्च तापमानावर वितळलेल्या स्टीलने भरलेला लॅडल (मोठे स्टील भांडे) अचानक फुटल्याने हा अपघात झाला. यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कर्मचारी व अधिकारी जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे पळताना दिसले. ही दुर्घटना स्टील प्लांटच्या एसएमएस-2 (SMS-2) आणि एसटीसी-3 (STC-3) हीट एफजी विभागात घडली.

नेमकं काय घडलं?

या अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, क्रेनच्या सहाय्याने उकळत्या स्टीलला वर उचलले जात होते. सुमारे 1500 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानावर असलेले हे स्टीलचे भांडे अचानक नियंत्रणाबाहेर गेले आणि उकळते स्टील खाली काम करणाऱ्या कामगारांवर कोसळले. अपघातानंतर स्टील प्लांटची अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी दाखल झाली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या दुर्घटनेत अनेक कामगार गंभीररीत्या भाजले गेले, तर काही कामगार भीतीपोटी घटनास्थळावरून पळून गेले.

प्रशासनाला मदतीच्या सूचना

आंध्र प्रदेशच्या गृहमंत्री वांगलापुडी अनीता यांनी विशाखापट्टणम स्टील प्लांटमध्ये झालेल्या भीषण अपघाताची तात्काळ दखल घेतली. त्यांनी फोनवरून विशाखापट्टणम जिल्हाधिकारी आणि शहर पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून दुर्घटनेची सविस्तर माहिती घेतली. गृहमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. तसेच दुर्घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य अधिक वेगाने राबवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. अपघाताची माहिती मिळताच वांगलापुडी अनीता तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाल्या आहेत. त्या सतत फोनद्वारे अधिकाऱ्यांशी संपर्कात असून परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक सूचना देत आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • चौथी पासांसाठी खुश खबर, थेट सरकारी नोकरी, मुंबई हायकोर्टातच व्हा भरती, पटापट करा अर्ज
  • नाशिकच्या कुंभमेळ्याच्या खर्चातील 0.1 टक्के…; संजय राऊतांकडून न्यायमूर्ती वराळेंचं कौतुक, पण मनातलंही बोलूनही दाखवलं
  • Bigg Boss फेम भजन सम्राट वयाच्या 73 व्या वर्षी उरकणार चौथं लग्न? म्हणाले, ‘3 लग्न करण्यास मनाई नाही, पण बायका ठेवण्यास…’,
  • चपाती लगेच कडक होते? फुगत नाही? कणिक मळताना करताय या चुका
  • ‘अभिनेता सिद्धार्थ जाधवची मृत्यूशी झुजं…’, भडकला अभिनेता, पोस्ट करत म्हणाला, ‘घाई तरी कसली…’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in