• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! ओमराजेंच्याच भावाचा ओमराजेंवर गंभीर आरोप; थेट म्हणाले त्यांनी… नेमकं प्रकरण काय?

August 28, 2026 by admin Leave a Comment


मकरंद निंबाळकर यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे मकरंद निंबाळकर हे ठाकरे गटातील माजी सहसंपर्कप्रमुख तसेच ओमराजेंचे लांबचे सोयरीक आहेत. त्यांनी सांगितले की, गेल्या दीड महिन्यांपूर्वी त्यांचे खासदार पक्ष सोडून निघून गेले होते. आता ओमराजे निंबाळकर यांनी त्यांचे नगरसेवक आणि पंचायत समिती सदस्यांना फोडल्याचे निंबाळकर यांनी म्हटले आहे. हे कृत्य अत्यंत वाईट असून, याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असे मकरंद निंबाळकर यांनी नमूद केले. निवडून आलेले सदस्य हे मशाल चिन्हावर निवडून आले होते. जर ताकद होती, तर ओमराजे यांनी या सदस्यांना राजीनामा देऊन धनुष्यबाण चिन्हावर पुन्हा निवडणूक लढवून जिंकून आणायला हवे होते, असे आव्हानही मकरंद निंबाळकर यांनी दिले. यासोबतच, गेल्या आठवड्यात भाजपने कळंबमधील नऊ नगरसेवक फोडल्याचा आरोपही मकरंद निंबाळकर यांनी केला.

या प्रकारामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी असून, यामागे राणा पाटील आणि भाजप असल्याचे त्यांनी म्हटले. भविष्यात शिवसैनिकांकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास त्याचे गंभीर राजकीय परिणाम होतील, असा इशाराही मकरंद निंबाळकर यांनी ओमराजे निंबाळकर आणि राणा पाटील यांना दिला आहे. अशा प्रकारच्या राजकारणामुळे लोकशाहीला धोका निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ashish Shelar : रिक्षा चालकांना वर्षभर मुदत देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर एकनाथ शिंदे नाराज का? आशिष शेलारांचं उत्तर काय
  • IND vs SL: कोलंबोतील सामन्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंचे घाबरवणारे फोटो समोर, असं घडलं तरी काय?
  • Disha Salian: एवढ्या उंचावरून पडून फक्त तोंडातून रक्त आलं का? दिशा सालियन प्रकरणात न्यायाधीशांचा सवाल
  • देशासोबत गद्दारी करणारे हेच ते साहिल-समीरा, काही हजारात पाकिस्तानला विकले गेले, चौकशीतून धक्कादायक माहिती समोर
  • फक्त 90 मिनिटं… नेपाळ आणि चीनला महाअलर्ट, धोका वाढला, नवं संकट काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in