• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

देशासोबत गद्दारी करणारे हेच ते साहिल-समीरा, काही हजारात पाकिस्तानला विकले गेले, चौकशीतून धक्कादायक माहिती समोर

August 28, 2026 by admin Leave a Comment


दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या नॉर्दन रेंजने पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI साठी हेरगिरी करणाऱ्या मॉड्यूलचा खुलासा केला आहे. दिल्लीच्या एका युवा जोडप्याला अटक केली आहे. पोलिसांनुसार, दोन वर्ष 2024 पासून हे जोडपं पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात होतं. त्यांच्यासाठी हे दोघे काम करत होते. अटक केलेल्या आरोपींची ओळख पटली आहे. 25 वर्षीय मोहम्मद साहिल आणि त्यांची 21 वर्षांची पत्नी देशासोबत गद्दारी करत होते. पोलिसांनी दोघांचे मोबाइल फोन जप्त केले आहेत. फॉरेंसिक तपासातून पाकिस्तानी हँडलर्स सोबत झालेल्या आक्षेपार्ह चॅटचा पुरावा मिळाला आहे. वर्ष 2024 मध्ये साहिल समीराच्या माध्यमातून इन्स्टाग्रामवर पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात आला. त्या एजंटनेच पुढे जाऊन साहिल आणि समीराची ओळख पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिवशी केली. PIO ने दोघांना आपल्या नेटवर्कमध्ये सहभागी करुन घेतलं. त्या बदल्यात आर्थिक मदतीचं आश्वासन दिलं.

साहिल आणि समीराने वर्ष 2024, 2025 मध्ये 8 भारतीय सीमकार्ड पाकिस्तानात पाठवले. हे सीम कार्ड दुबईमार्गे पाकिस्तानात गेले. त्या बदल्यात पाकिस्तानी हँडलर्सनी दोघांना जवळपास 30 हजार रुपये दिले. पाकिस्तानात गेल्यानंतर या भारतीय नंबरवर व्हॉट्स अप अकाऊंट सुरु झाले असा पोलिसांचा दावा आहे. या अकाऊंटच्या माध्यमातून काही पाकिस्तानी एजंट भारतीय व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी झाले. त्या मार्गाने भारताच्या संरक्षण क्षेत्राशी संबंधित संवेदनशील माहिती गोळा करण्याचा प्रयत्न झाला. या नंबर्सचा वापर भारतात लोकांशी संपर्क करण्यासाठी सुद्धा झाला.

समीराची भूमिका महत्वाची

साहिलवर भारतातील वेगवेगळ्या भागात कँटोनमेंट एरियात रेकी करण्यासाठी लोकांची भरती करण्याची जबाबदारी होती, तपासातून हे समोर आलं आहे. त्या शिवाय सैन्यातील माणसांची माहिती गोळा करण्याची जबाबदारी होती. यात कार्ट मार्शलशी संबंधित लवादाकडे असलेली प्रकरणं होती. साहिलच्या अटकेनंतर चौकशीत त्याच्या पत्नीची भूमिका समोर आली. सीम कार्ड पाकिस्तानात पाठवण्यात समीराची भूमिका महत्वाची होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

दोन मोबाइल फोन जप्त

स्पेशल सेलच्या नॉर्दर्न रेंज टीमने इंस्पेक्टर अनुज नौटियाल आणि इंस्पेक्टर चंदन कुमार यांच्या नेतृत्वाखाली कारवाई केली. टीम एसीपी राहुल कुमार सिंह यांच्या निरीक्षणाखाली काम करत होती. दोघांच्या चौकशीतून पाकिस्तानात बसलेले हँडलर्स आणि त्यांच्या नेटवर्कच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल महत्वाची माहिती मिळाली आहे. दोघांकडून कारस्थान आणि कथित हेरगिरीसाठी वापरलेले दोन मोबाइल फोन जप्त केले आहेत.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेत भारतासारखं वोटर कार्ड नसतं? मग मतदान कसं करतात, जाणून घ्या
  • CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, Video शेअर करत संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
  • LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर… लष्कराला मोठं यश
  • ‘आमच्या उपोषणावर सरकारच.. पण,आमच्या मुलांना त्रास द्यायचा नाही,’ काय म्हणाले मनोज जरांगे ?
  • NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in