• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अमेरिकेत भारतासारखं वोटर कार्ड नसतं? मग मतदान कसं करतात, जाणून घ्या

August 28, 2026 by admin Leave a Comment


भारतात जेव्हा मतदानाचा हक्क बजावला जातो तेव्हा भारताच्या प्रत्येक नागरिकाकडे मतदार ओळखपत्र असतंच. त्यामुळे मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र आवश्यक असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की भारताबाहेरील असलेला देश अमेरिकामध्ये मतदान करताना कोणते ओळखपत्र लागते. कारण अमेरिकेत भारतासारखे एकच देशभर लागू असलेले मतदार ओळखपत्र नाही. अमेरिकेत मतदाराची ओळख कशी तपासायची आणि कोणती कागदपत्रे स्वीकारायची, हे तेथील प्रत्येक राज्याच्या नियमांवर अवलंबून असते. चला तर मग आजच्या लेखात अमेरिकेत मतदान करताना कोणते ओळखपत्र आवश्यक असतं त्याबद्दल जाणून घेऊयात.

अमेरिकेत मतदानासाठी कोणते ओळखपत्र आवश्यक असते?

अमेरिकेत, मतदान करताना ओळख सिद्ध करण्यासाठी सर्वात जास्त वापरले जाणारे दस्तऐवज म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स. अमेरिकेतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भारताइतकी सहज उपलब्ध नाही, त्यामुळे जवळपास प्रत्येक नागरिकाकडे वाहनचालक परवाना असतो. हा परवाना कॅलिफोर्निया, टेक्सास किंवा न्यूयॉर्क यांसारख्या संबंधित राज्य सरकारद्वारे जारी केला जातो आणि त्यात नागरिकाचा फोटो, नाव आणि पत्ता असतो, जे मतदार यादीशी जुळणे आवश्यक असते.

अमेरिकेत काय नियम आहेत?

अमेरिकेत भारतासारखे एकच देशव्यापी मतदार ओळखपत्र नाही. मतदानासाठी ओळखपत्र आवश्यक आहे की नाही आणि कोणते कागदपत्र चालेल, हे राज्यानुसार बदलते.

ज्या राज्यांमध्ये ओळखपत्र आवश्यक आहे, तिथे ड्रायव्हिंग लायसन्स, राज्य सरकारचे ID कार्ड, पासपोर्ट, मिलिटरी ID किंवा इतर मान्य कागदपत्रे स्वीकारली जाऊ शकतात. काही राज्यांमध्ये फोटो नसलेले कागदपत्र, जसे की बँक स्टेटमेंट किंवा युटिलिटी बिल, देखील विशिष्ट परिस्थितीत स्वीकारले जाते.

त्यामुळे अमेरिकेत मतदान करण्यासाठी नेमके कोणते ID लागेल, हे तुम्ही ज्या राज्यात मतदान करत आहात त्याच्या नियमांवर अवलंबून असते.

काही राज्यांमध्ये ओळखपत्राची आवश्यकता नसते.

विशेष म्हणजे, अमेरिकेतील काही राज्यांमध्ये आणि वॉशिंग्टन डी.सी. मध्ये मतदानासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नसते. मतदान केंद्रावरील कर्मचारी फक्त मतदाराचे नाव आणि पत्ता विचारतात आणि त्याची नोंदणी यादीशी जुळवणी करतात, किंवा सही केलेल्या सहीची मागील नोंदींशी तुलना करतात. तथापि, या राज्यांमध्ये सुद्धा, जे मतदार पहिल्यांदाच टपालाद्वारे नोंदणी करतात, त्यांना पहिले मत देताना ओळखपत्र मागितले जाते.

नोंदणी आणि मतदानाचे नियम वेगवेगळे आहेत.

एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेत मतदार नोंदणी करताना आणि मतदानाच्या दिवशी लागणारी कागदपत्रे वेगवेगळी असू शकतात. नोंदणीसाठी वीज बिल, बँक स्टेटमेंट यांसारखी कागदपत्रे काही ठिकाणी स्वीकारली जाऊ शकतात. मात्र, मतदानाच्या वेळी काही राज्यांमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इतर फोटो ID दाखवणे आवश्यक असते.

म्हणूनच अमेरिकेत मतदानासाठी नेमकं कोणतं ओळखपत्र लागेल, हे राज्यानुसार बदलतं.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेत भारतासारखं वोटर कार्ड नसतं? मग मतदान कसं करतात, जाणून घ्या
  • CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, Video शेअर करत संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
  • LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर… लष्कराला मोठं यश
  • ‘आमच्या उपोषणावर सरकारच.. पण,आमच्या मुलांना त्रास द्यायचा नाही,’ काय म्हणाले मनोज जरांगे ?
  • NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in