
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीत पुन्हा उपोषण सुरु केले आहे. २९ ऑगस् पासून कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या धोरणाविरोधात आपण उपोषण करणार अशी घोषणा जरांगे पाटील यांनी केली होती. त्याप्रमाणे त्यांनी उपोषण सुरु आहे. सरकारच्या वतीने राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पीएचा आपल्याला फोन आला होता. ते उद्या चर्चेला येणार आहेत. आम्ही त्यांना सहकार्य करु, पोलिसांना देखील आमचे संपूर्ण सहकार्य असेल. कायद्याचे पालन आम्ही करु असे मनोज जरांगे पाटील यांनी रात्री उशीरा आंतरवाली येथे उपोषणापूर्वी प्रतिक्रीया देताना सांगितले.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply