• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर आढळल्या दारूच्या बाटल्या, पुण्यात नेमकं चाललंय तरी काय?

May 30, 2026 by admin Leave a Comment


पुण्यात विषारी दारूचे सेवन केल्यामुळे तब्बल 18 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या घटनेनंतर प्रशासनाला जाग आली असून या प्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. अशातच आता पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग मद्य आणि अमली पदार्थांच्या निर्मिती, विक्री व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करत असतो. मात्र आता पुण्यातील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाच्या छतावरच दारुच्या बाटल्या आढळल्या आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पुण्यात युवक काँग्रेसचे आंदोलन

पुण्यात विषारी दारूमुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. याचा निषेध करत पुण्यात युवक काँग्रेसने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये झालेल्या विषारी दारू प्रकरणानंतर युवक काँग्रेस आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. या आंदोलना दरम्यान होणारा गैरप्रकार टाळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

उत्पादन शुल्क कार्यालयाच्या पत्र्यावर दारूच्या बाटल्या

पुण्यात युवक काँग्रेसचे आंदोलन सुरू असताना राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या पत्र्यावर दारूच्या बाटल्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. कार्यालयाच्या वरील पत्र्यावर काही काचेच्या दारूच्या बाचल्या आणि टिन आढळले आहेत. कार्यालयाच्याच पत्र्यावर दारूच्या बाटल्या आढळल्याने, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी नक्की करतायेत काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

दरम्यान, पुण्यातील विषारी दारू प्रकरणी 13 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने काल एका दिवसात 55 ठिकाणी हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या ठिकाणांवर कारवाई केली आहे. या कारवाईत 4480 लिटर हातभट्टी जप्त करून नष्ट करण्यात आली. तसेच 42 हजार लिटर दारू बनवण्याचे रसायन जप्त करून नष्ट करण्यात आले. या प्रकरणी 55 आरोपींना राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक केली आहे. तसेच या कारवाईत 24 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे.

उत्पादन शुल्क कार्यालयावर दारूच्या बाटल्या



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताच मोठ्या घडामोडी, एकनाथ शिंदेंचे थेट आदेश..
  • Aaditya Thackeray : फेकनाथ मिंधे..सगळे रात्रीचे खेळ..आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंच्या जिव्हारी लागणारे शब्द
  • पवनराजेंच्या हत्येपासूनचा वैर अन्… पद्मसिंह पाटलांच्या मुलाचं ओमराजेंबाबत मोठं विधान; महायुतीत आता…
  • किसिंग सीन दरम्यान 20 वेळा रिटेक, रागात नंतर अभिनेत्रीने जे केलं ते ऐकून व्हाल थक्क
  • आदेश बांदेकर पुन्हा दिसणार मालिकेत! प्रोमोने वेधले लक्ष, मालिकेचे नाव काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in