• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा

July 1, 2026 by admin Leave a Comment


शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने विधान परिषद उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया देत ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना गुलाबराव पाटील म्हणाले की, “आम्ही जे भाकीत करत होतो, ते आता खरे ठरताना दिसत आहे. फक्त भाषणे देऊन राजकारण होत नाही, तर जनतेपर्यंत रेशन आणि विकासाची कामेही पोहोचवावी लागतात. तळागाळात जाऊन लोकांमध्ये काम केल्याशिवाय जनतेचा विश्वास मिळत नाही.”

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे गटावर अप्रत्यक्ष निशाणा साधत, “शिंदे साहेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका करून काही साध्य होणार नाही. आपल्या वक्तव्यांवर संयम ठेवायला हवा. लोक सर्व पाहत आहेत,” असेही सांगितले.

दरम्यान, सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशानंतर आणखी काही आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांबाबत विचारले असता गुलाबराव पाटील यांनी सूचक विधान केले. “काही गोष्टींची गोपनीयता राखावी लागते. मात्र इतके नक्की सांगतो की, तुम्हालाही आश्चर्य वाटेल असे अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात आहेत,” असा दावा त्यांनी केला.

गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असून, आगामी काळात ठाकरे गटाला आणखी धक्के बसणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Kunal Chandgude : म्हणायचा माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे अन्…, कुणालच्या आईचा पतीवर खळबळजनक आरोप, नवा Video
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे अडचणीत? नाशिकमध्ये केलेल्या कारवाईविरोधात व्यापारी थेट कोर्टात
  • Govinda: गोविंदा कोमलसोबत नवीन Video, कॅमेरा पाहताच केलं असं काही; चर्चांना उधाण
  • Amravati Hospital Fire : 3 बालकांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांचा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप
  • सरकारचं सर्वात महत्वाचं पाऊल, कांद्याच्या दरात मोठी घसरण होणार; सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in