• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी घोषणा! ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा

July 23, 2026 by admin Leave a Comment


दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन, लाठीचार्ज आणि NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ मोठी घोषणा करत 26 तारखेला मुंबईत शक्तीप्रदर्शन मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

राज ठाकरे म्हणाले की, विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अद्याप राजीनामा न दिल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या भावना आणि संताप सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा मोर्चा काढला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, “26 तारखेला आम्ही विद्यार्थ्यांसह शक्तीप्रदर्शन मोर्चा काढणार आहोत. मुंबईतील विद्यार्थी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यांच्या मनातील राग आणि रोष व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा असेल. हा संदेश केंद्र सरकारपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे.”

या मोर्चाची सुरुवात शिवाजी पार्क येथून होणार असून तो सिद्धिविनायक मंदिरापर्यंत जाणार आहे. सिद्धिविनायक येथे सरकारला सद्बुद्धी मिळावी, अशी प्रार्थना करण्यात येणार असून त्यानंतर मोर्चाची सांगता होईल, अशी माहितीही राज ठाकरे यांनी दिली.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मिळणारा वाढता पाठिंबा आणि ठाकरे बंधूंनी दिलेल्या या घोषणेमुळे 26 तारखेला होणाऱ्या मोर्चाकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Disha Salian Case Update | दिशा सालियान प्रकरणी सुनावणी; कोर्टात काय घडलं?
  • मुंडे बंधू-भगिनींसह अदिती तटकरेंनी साजरा केला रक्षाबंधन उत्सव; पहा व्हिडीओ
  • Nepal Flash Flood: ‘आम्हाला मदतीची गरज नाही’, महापूराने नेस्तनाबूत केल्यावरही नेपाळनं का नाकारली मदत? ते मोठं कारण समोर
  • अतिशय भयंकर, नेपाळच्या पुराच्या पाण्यातून उत्तर प्रदेशात वाहून आली प्रेत, थेट..
  • Ashish Shelar : रिक्षा चालकांना वर्षभर मुदत देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर एकनाथ शिंदे नाराज का? आशिष शेलारांचं उत्तर काय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in