
नेपाळमध्ये पुराने थैमान घातले. त्यामध्येच आता मोठा अलर्ट जारी करण्यात आला. भयंकर पूर नेपाळमध्ये आला. 1200 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. बचावकार्य राबवले जात आहे. त्यामध्येच तिबेटमध्ये धरण फुटल्याने धोका अधिक निर्माण झाला. नेपाळमधील परिस्थिती काही नियंत्रणात येताना दिसत नाही. हजारो लोक या पुरात वाहून गेले. माती, दगडे हे पुराच्या पाण्यात वाहून आले. बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. या पुरात जीव गेलेल्या लोकांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामध्येच नेपाळच्या हाहाकारात कचाट्यात आलेल्या लोकांचे मृतदेह थेट भारतात वाहून आलीत. नारायणी (गंडक) नदीतून बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह सापडण्यास सुरुवात झाली आहे. हा एक भयंकर अनुभव आहे. थेट नेपाळमध्ये आलेल्या पुराचे पाणी भारतात आले, असून त्यासोबतच मृतदेहही वाहून आली आहेत.
उत्तर प्रदेशमध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला. उत्तर प्रदेशच्या महराजगंज जिल्हात पुराच्या पाण्यात मृतदेह वाहून आल्याने सशस्त्र सीमा बलाने आणि बचाव टीमकडून नारायणी नदीत वाहून आलेले नेपाळमधील मृतदेह ताब्यात घेण्यात आली. यामध्ये दोन पुरूषांचे तर एका महिलेचा मृतदेह आहे. भारतीय सीमेच्या जवळ तीन किलोमीटर नेपाळकडे जवळपास 12 पेक्षा जास्त मृतदेह बचावकार्य बाहेर काढण्यात आले.
नेपाळमधील विनाशाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार अलर्ट मोडवर आहे. नदीच्या किनाऱ्यावर असलेले गाव रिकामी करण्यात आलीत. महराजगंजचे जिल्हाधिकारी गाैरव सिंह सोगरवाल यांनी सांगितले की, रात्री 8 वाजता नेपाळमधून आलेले साधारणपणे दीड लाख क्यूसेक पाणी सोडले गेले. जलस्तरात मोठी वाढ झाली. नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या गावांना अलर्ट मोड जारी करण्यात आला असून प्रशासनाचे परिस्थितीवर बारीक लक्ष आहे.
आमचे पूर्ण प्रशासन तैनात आहे. नेपाळहून लाकडे, प्लाईवुड, घरातील साहित्य वाहून आले. ते काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. तब्बल तीन मृतदेह वाहून आली आहेत. त्यामुळे नेपाळमधील परिस्थिती नक्की काय आहे, याचा अंदाज तुम्हाला येईल. तब्बल 30 देशांचे पर्यटक नेपाळमध्ये अडकली आहेत. भारतातीलही पर्यकट नेपाळमध्ये अडकून आहेत.
Leave a Reply