• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Kangana Ranaut : देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो… कंगनाची रामदेव बाबांसाठी खास पोस्ट, भाऊ म्हणून उल्लेख; असं काय घडलं?

August 28, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, तसेच भाजपच्या खासदार कंगना रानौत (Kangana Ranaut) आणि योगगुरू बाबा रामदेव यांच्यात गेल्या काही काळापासून चांगलाच वाद भडकला आहे. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नव्हते. कंगना यांनी ‘गटर पिढी’ असा उल्लेख करत केलेल्या वक्तव्याचा रामदेव बाबांनीनिषध करत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्यामुळे नाराज झालेल्या कंगना यांनीही योगगुरूवर जबरदस्त पलटवार केला. काही दिवसांपूर्वी सुरू झालेला हा वाद वाढतच चालला होता, मात्र अखेर आज रक्षाबंधनाच्या सणाच्या दिवशी या वादावर पडदा पडतान दिसत आहे.

वाद मिटवण्यात स्वामी रामदेव यांचा पुढाकार

नुकतीच हरिद्वारमधील एका कार्यक्रमात बाबा रामदेव यांनी कंगना यांची आठवण काढली आणि त्यांनी खास संदेशही दिला. एवढंच नव्हे तर स्वामी रामदेव यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने कंगना यांच्यासोबतचा वाद विसरून तिला मिठाई आणि भेटवस्तूही पाठवल्या. विशेष म्हणजे, माध्यमांशी संवाद साधताना रामदेव यांनी स्वतः  याची माहिती दिली आणि या वादावरही आपली भूमिका स्पष्ट केली. ‘ माझी (बहीण) कंगना रनौतला मी पोस्टाने गिफ्ट आणि मिठाई पाठवत आहे. कोणत्याही कारणामुळे द्वेष निर्माण होऊ नये आणि एकमेकांविषयी वैराची भावना असता कामा नये. त्यामुळे आम्ही वैराचा त्याग केला आहे’ असं त्यांनी म्हटलं. तसेच मिठाई आणि भेटवस्तू पाठवल्यानंतर कंगना यांना फोन करून रक्षाबंधनाच्या शुभेच्छाही देणार असल्याचंही रामदेव यांनी नमूद केलं.

कंगना यांनीही स्वीकारलं मोठ्या भावाचं प्रेम

विशेष म्हणजे, बाबा रामदेव यांचा संदेश आणि त्यांनी पाठवलेल्या भेटवस्तू कंगना रानौत यांनीही मनापासून स्वीकारल्या. एवढंच नव्हे तर त्यांनी, बाबा रामदेव यांना आपला मोठा भाऊ संबोधत इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्टही लिहीली. सणाचा दिवस हा झालेल्या चुका आणि गैरसमज विसरून सर्वांना माफ करण्यासाठी असतो. बाबा रामदेव यांनी “वाद नाही, तर संवाद झाला पाहिजे” असे सांगितंल, त्याबद्दल कंगना यांनी कौतुकही केलं, रक्षाबंधनाच्या दिवशी रामदेव यांनी पाठवलेली मिठाई आणि मोठ्या भावाचे प्रेम, दोन्ही आपण स्वीकारत असल्याचंही कंगना यांनी नमूद केलं. तसेच तिने त्यांचे आभार मानत देव तुम्हाला दीर्घायुष्या देवो, अशा शुभेच्छाही दिल्या.

काय होता वाद ?

काही दिवसांपूर्वी कंगना यांच्या ‘गटार पिढी’ या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना स्वामी रामदेव यांनी फटकारलं होतं. तसेच कंगना यांच्या मानसिक स्थितीवर प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरून कंगना यांनीही पलटवार करत जोरदार प्रत्युत्तर दिल होतं. त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगला होता.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नाशिकच्या शेती क्षेत्रातील क्रांती विलक्षण, फडणवीसांकडून शेतकऱ्यांचे कौतुक
  • Nepal Flood Update | महाप्रलयात जीव मुठीत धरून कुटुंब; प्रत्येक क्षण… नवा थरारक व्हिडिओ समोर
  • अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेपूर्वी सूर्यकुमार यादवचं थेट विधान, संघात कमबॅकसाठी म्हणाला की…
  • Nepal Flash Flood : नेपाळच्या विनाशात मोठी दिलासादायक बातमी, त्रिशुली प्रकल्पात मोठे यश, अजूनही..
  • तू सुंदर परीसारखी दिसतेस.. म्हणत पँटची झिप उघडली, IIM कँपसमध्ये नको ते घडलं, आरोपीला अटक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in