• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेपूर्वी सूर्यकुमार यादवचं थेट विधान, संघात कमबॅकसाठी म्हणाला की…

August 28, 2026 by admin Leave a Comment

भारतीय टी20 संघाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादव संघात परतणार का? त्याच्या चाहत्यांना पुन्हा सुपला शॉट पाहायला मिळणार का? असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. कारण भारताला टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत जेतेपद मिळवून दिल्यानंतर सूर्यकुमारला बाहेरचा रस्ता दाखवला गेला आहे. वर्ल्डकप स्पर्धेत अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. वर्ल्डकप जिंकल्यानंतर आयपीएल स्पर्धा पार पडली आणि जून 2026 मध्ये आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी संघाची घोषणा करण्यात आली. यावेळी कर्णधाराच्या भूमिकेत असलेल्या सूर्यकुमार यादवलाच वगळण्यात आलं. इतकंच काय तर कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आलं. त्यामुळे गेले अडीच तीन महिने भारतीय संघातून बाहेर आणि कमबॅक करेल की नाही याबाबत साशंकता आहे.

काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

भारतीय संघाचा माजी टी20 कर्णधार सूर्यकुमार यादवने पुनरागमनाबाबत सकारात्मक आणि स्पष्ट वक्तव्य केलं आहे. त्याने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी पत्रकारांना त्याला गराडा आणि प्रश्नांचा भडिमार केला. तेव्हा सूर्यकुमार यादव म्हणाला की, ‘पाहा, मी संघात पुनरागमन करण्यासाठी खूप मेहनत घेत आहे आणि माझ्याकडून जे काही शक्य आहे ते सर्व मी करत आहे. जर आगामी काळात गोष्टी योग्य रीतीने जुळून आल्या, तर सर्व काही ठीक होईल आणि गोष्टी सुरळीत होतील.’ सूर्यकुमार यादवच्या वक्तव्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, त्याने अद्याप संघात पुनरागमनाच्या आशा सोडलेली नाही.

सूर्यकुमार पुनरागमन करेल का?

सूर्यकुमार यादवसाठी टीम इंडियाची दारं बंद झाल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. पण बीसीसीआयच्या सूत्रांनुसार सूर्यकुमारला अजूनही संघात परतण्याची संधी आहे. पण यासाठी त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणं आवश्यक आहे. सूर्यकुमार यादवला जुना फॉर्म पुन्हा मिळण्यासाठी आता आगामी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी20 स्पर्धा आणि देशांतर्गत स्पर्धेत चांगली कामगिरी करावी लागणार आहे. त्यामुळे आगामी टी20 मालिकेत त्याला संधी मिळणार नाही, हे आता स्पष्ट आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतही त्याला डावललं जाईल.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • प्रियदर्शिनी इंदलकरने बहिण मधुमतीसोबत साजरं केलं रक्षाबंधन; सर्वांकडून होतंय कौतुक
  • Manoj Jarange : एकदा निर्णय झाला तो झलाच! जरांगे पाटलांचे अंतरवाली सराटीत आंदोलन, मुंबईतही…
  • संपादकीय बदल करण्यास नकार दिल्याने ‘पेंग्विन’ने माघार घेतली का? सोनिया गांधींच्या आत्मचरित्राबाबत प्रकाशकाचा अखेर मोठा खुलासा
  • Sharad Pawar : मुंबई कुणाची? शरद पवारांनी एका वाक्यात दिलं उत्तर, नेमकं काय म्हणाले?
  • Milk Price : साखरेचे दर घसरले पण आता दूध महागणार; किती रुपयांची होणार वाढ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in