• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्रियदर्शिनी इंदलकरने बहिण मधुमतीसोबत साजरं केलं रक्षाबंधन; सर्वांकडून होतंय कौतुक

August 28, 2026 by admin Leave a Comment


छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर सोशल मीडियावरही कायम चर्चेत असते. यंदाच्या रक्षाबंधनानिमित्त प्रियदर्शिनीने तिची बहीण मधुमती हिच्यासोबत हा खास सण साजरा केला. या सेलिब्रेशनचा एक सुंदर व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला असून, दोन्ही बहिणींमधील प्रेम पाहून नेटकरी भावुक झाले आहेत.

प्रियदर्शिनीने रक्षाबंधनासाठी सुंदर पारंपरिक साडी नेसली होती. ऑक्सिडाइज्ड कानातले आणि साध्या लूकमध्ये तिचं सौंदर्य खुलून दिसत होतं. व्हिडीओमध्ये मधुमती प्रियदर्शिनीला ओवाळताना आणि तिच्या मनगटावर राखी बांधताना दिसत आहे. यावेळी प्रियदर्शिनीने प्रेमाने मधुमतीचा हात धरून तिला आधार दिला. बहिणीची काळजी घेतानाचा तिचा हा अंदाज नेटकऱ्यांच्या विशेष पसंतीस उतरला.

नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

प्रियदर्शिनीच्या या व्हिडीओवर अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि डान्सर आशीष पाटील यांनी रेड हार्ट इमोजीच्या माध्यमातून प्रेम व्यक्त केले. अभिनेता सिद्धार्थ मेनन आणि निर्माती मेघना जाधव यांनीही दोन्ही बहिणींना शुभेच्छा देत त्यांच्या नात्याचं कौतुक केलं.

एका नेटकऱ्याने प्रियदर्शिनीचं कौतुक करत, “ताई, तू एका मोठ्या भावाप्रमाणे कर्तव्य पार पाडतेयस. ज्या पद्धतीने तिला सांभाळतेस, त्याबद्दल खरंच सलाम तुला,” अशी प्रतिक्रिया दिली. तर आणखी एका चाहत्याने दोघींमधील प्रेम आणि आपुलकीचं कौतुक करत त्यांच्या नात्याला सुंदर असल्याचं म्हटलं.

कोण आहे मधुमती?

मधुमती ही प्रियदर्शिनीची चुलत बहीण असून तिला डाऊन सिंड्रोम आहे. मात्र या गोष्टीला मर्यादा न मानता मधुमतीने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिने स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत Bocce या खेळात रौप्यपदक मिळवलं आहे.

प्रियदर्शिनी अनेक कार्यक्रम आणि इव्हेंटमध्ये मधुमतीसोबत सहभागी होताना दिसते. दोघींमधील घट्ट नातं आणि एकमेकींबद्दलचा जिव्हाळा सोशल मीडिया पोस्टमधूनही अनेकदा पाहायला मिळतो. त्यामुळे यंदाच्या रक्षाबंधनाचा त्यांचा हा खास क्षण चाहत्यांसाठीही भावनिक ठरला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uniqueness With This-Ability (@uniquenesswiththisability)

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ते रुपेरी पडदा

प्रियदर्शिनी इंदलकरने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली. आपल्या विनोदी अभिनयाने आणि सहजसुंदर शैलीने तिने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. छोट्या पडद्यावर लोकप्रिय झाल्यानंतर तिने चित्रपटांमध्येही विविध भूमिका साकारल्या आहेत.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर… लष्कराला मोठं यश
  • ‘आमच्या उपोषणावर सरकारच.. पण,आमच्या मुलांना त्रास द्यायचा नाही,’ काय म्हणाले मनोज जरांगे ?
  • NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती
  • रक्षाबंधनानिमित्त अभिजीत दिपकेंच्या हातात झुरळाची राखी, त्यावर लिहिलं होतं; राजीनामा…
  • Airtel चे 3 भन्नाट Unlimited 5G प्लान्स, रोज मिळेल इतका डेटा, किंमत देखील कमी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in