• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मुंबईतील सोसायटीत कुर्बानीवरून वाद, परवानगी केली रद्द

May 28, 2026 by admin Leave a Comment


Bakri Eid : बकरी इदच्या पार्श्वभूमीवर मुंबई, उनगरातील अनेक सोसायट्यांत कुर्बानीवरून वाद निर्माण झाल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी सोसायटीतील इतर सदस्यांनी कुर्बानीसाठी आणलेले बकरे ठेवण्यास मनाई केली. तर काही सोसायट्यांनी कुर्बानीला दिलेली परवानगी मागे घेतली आहे. मुंबईतील गोरेगाव येथील सॅटेलाईट गार्डन्स फेज-2 या सोसायटीत बुधवारी वाद झाल्यानंतर कुर्बानीची परवानगी रद्द केली आहे. एकीकडे कुर्बानीची तयारी केली जात असताना परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत कुर्बानीची ही परवानगी रद्द केली आहे.

दिंडोशी परिसरातील सोसायटीत वाद

न्यूज एजन्सी एएनआयने दिलेल्या माहितीनुसार दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांनी या प्रकरणाविषयी सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार सोसायटीच्या परिसरात आता कुर्बानी देण्यास मनाई असेल. तेथे ठेवण्यात आलेल्या बकऱ्यांनाही हटवण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. दिंडोशी परिसरातील आझाद नगर डी-3 इमारतीतही बीएमसीने अगोदर कुर्बानीसाठी परवानगी दिली होती. आता ही परवानगी बीएमसीने मागे घेतली आहे. सोसायटीपासून एक किलोमीटरच्या परिसरात मटण शॉप आहे. त्यामुळे ही परवानगी रद्द करण्यात आली आहे, असे सांगण्यात आले आहे.

घाटकोपरच्या सोसायटीमध्ये वाद

मुंबईती सोसायट्यांमध्ये कुर्बानीसाठी दिली जाणारी परवानगी वादाचा मुद्दा होत आहे. बुधवारी घटकोपर पश्चिममधील सागर पार्क हाऊसिंग सोसायटीमध्ये असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. या ठिकाणी सोसायटीच्या परिसरात कुर्बानीची तयारी केली जात होती. परंतु यावर काही लोकांनी आक्षेप घेतला. त्यामुळे तेथे काही काळासाठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या घटनेची माहिती मिळताच भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी त्या सोसायटीमध्ये जाऊन बीएमसी प्रशासनाला सवाल केले. आम्ही अगोदरच या सोसायटीमध्ये कुर्बानी देण्यास नकार दिला होता, असे बीएमसीने सांगितले आहे. दरम्यान, बकरी ईदची जय्यत तयारी केली जात आहे. तुरळक ठिकाण वगळता बाकीच्या ठिकाणी मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यासाठी तयारी होत आहे. प्रशासनानेही कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेतलेली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe: दहा दिशेला दहा तोंडं करून बसलोय, तुकाराम मुंढेंचा अधिकारी-कर्मचाऱ्यांना सज्जड दम; जीन्स-टीशर्टवरूनही सुनावलं
  • मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये श्रीमंतांची कोट्यवधींची गुंतवणूक; 10 लक्झरी प्रोजेक्ट्समध्ये 3,815 कोटींच्या घरांची विक्री
  • Govinda : गोविंदा – सुनीता यांच्या वादावर घरातल्याच सदस्याचं मोठं वक्तव्य, नेमकं सुरु तरी काय?
  • VIDEO : 10 बाय 10 ची रुम, नोटांनी भरलेल्या 30 बॅगा, महिला भिकाऱ्याच्या घरात इतका पैसा मिळाला, आकडा ऐकून थक्क व्हाल
  • Govinda: गोविंदा-सुनीताचा आणखी एक मोठा निर्णय; वैवाहिक आयुष्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in