• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मी सरकारचा भाग नाही, सुधीर मुनगंटीवार यांचं धक्कादायक विधान; भाजपच्या बैठकीआधीच…

August 31, 2026 by admin Leave a Comment


भारतीय जनता पार्टीच्या राज्य कार्यकारिणीची पुण्यात बैठक सुरू होत आहे. या बैठकीपूर्वीच राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एक मोठं विधान केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाशी संबंधित प्रश्नावर बोलताना मुनगंटीवार यांनी मी सरकारचा भाग नाहीये, असं विधान केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुधीर मुनंटीवार मीडियाशी संवाद साधत होते.

सुधीर मुनगंटीवार पक्षाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी पुण्यात आले होते. यावेळी त्यांना मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत विचारण्यात आले. त्यावर, सरकार नेहमीच संवाद करण्यास तयार आहे. संवादातून समाधानाकडून जाण्याचा मार्ग असतो. देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही संवाद करायला तयार आहोत, असं तीनदा सांगितलं आहे, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.

संवादाच्या टेबलवर मी नाही

सरकार संवाद करायला तयार आहे, तर अडतंय कुठे? असा सवाल मुनगंटीवार यांनी करण्यात आला. त्यावर मुनगंटीवार यांनी मोठं विधान केलं. कुठे अडतंय मला माहीत नाही. मी सरकारचा भाग नाहीये. मी आमदार आहे. लोकप्रतिनिधी आहे. संवादाच्या टेबलवर मी बसत नाही, असं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.

पुण्यात बॅनरबाजी

दरम्यान, पुण्यात भाजपच्या राज्यकार्यकारिणीची बैठक होत आहे. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीपूर्वी पुण्यात मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे.

आरक्षणावर चर्चा होणार

या बैठकीपूर्वी भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी मीडियाशी संवाद साधला. या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकार सकारात्मक आहे. त्यावर सरकार योग्य निर्णय घेईल. यापूर्वी मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा झाली आहे, असं रावसाहेब दानवे म्हणाले.

मुंबईत उद्या बैठक

दरम्यान, पुण्यातील भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडल्यानंतर उद्या मुंबई भाजपची महत्त्वाची बैठक होत आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. दादर येथील भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात भाजपची बैठक पार पडणार आहे. आगामी राजकीय आणि संघटनात्मक रणनीतीवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. बैठकीला मुंबई भाजपचे पदाधिकारी, प्रवक्ते, कार्यकारिणी सदस्य, मोर्चा-सेल-आघाडी प्रमुख, खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस, मंडल अध्यक्ष आणि वॉर्ड अध्यक्ष या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pratap Sarnaik : मंत्री प्रताप सरनाईक-नरेंद्र मेहता वाद पेटला; थेट राजीनाम्यावर प्रकरण पोहोचलं, कोण काय म्हणालं?
  • प्रचंड रोमँटिक गाणं, 100 वेळा ऐकूनही भरत नाही मन, 36 वर्षांपासून प्रेक्षकांचं प्रचंड आवडीचं
  • Mumbai News : केळी विकायला चाललेल्या मुंबईतील सुनीता मोरे मृत्यू प्रकरणाला नवीन वळण, फजुल रहमानने तिला दुकानात नेलं आणि..
  • Pratap Sarnaik : 39 कोटींचं टेंडर 160 कोटींवर नेलं, भाजप आमदाराचा मंत्री प्रताप सरनाईकांवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप
  • New Delhi Crime | महिला सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह! दिल्लीतील स्लीपर बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार, नेमकं घडलं काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in