
विक्रोळी कन्नमवार नगर येथे 32 वर्षीय महिलेच्या मृत्यू प्रकरणात वेगळं वळण लागलं आहे. मृत सुनीता मोरे यांची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. पोलिसांकडून या प्रकरणी आरोपी फजुल रहमान कुरेशी याला अटक करण्यात आली आहे. मृत सुनीता मोरे शनिवार केळी विकण्यासाठी जात होत्या. त्यावेळी आरोपी फजूल रेहमान मेहरबान कुरेशी याने सुनीता मोरे यांच्यावर अत्याचार करण्यासाठी त्यांना जबरदस्ती मच्छिमार्केट परिसरात बंद असलेल्या दुकानात नेल्याचं समोर आलं आहे.
मोरेंनी बचावासाठी आरडाओरड ओरडा आणि झटापट केली असता फजूलने सुनीता मोरे यांना जीवे ठार मारून तिथून पळ काढला. सुनीता मोरे यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा फजूल याला अटक केली. फजूलच्या या कृत्याबाबत लोकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
वडाळा पूर्वेत तरुणाचा खून
वडाळा पूर्वेत तरुणाचा चाकूने खून. हत्येमुळे परिसरात तणावाचे वातावरण. वडाळा टी.टी. पोलिस ठाण्याच्या हद्दीत जय भवानी माता मंदिराजवळ हत्येची घटना. मृत सुरेश यादव यांची चाकूने वार करून केली हत्या. पैशांच्या मागणीला विरोध केल्याच्या रागातून आरोपींनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती.आरोपी साहिल उर्फ कसाई, मोहम्मद अयान अहमद हसन शाह आणि इजाज लाडजादे खान उर्फ इज्जी या तिघांना ही पोलिसांनी केली अटक. आरोपींनी सुरेश यांचा हात पकडून चाकूने पोटात वार केल्याचे पोलिस तपासात समोर. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. डिटेक्शन पथकाने तिघांना अटक केली.गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त, वडाळा टी.टी. पोलिसांकडून सुरू.
Leave a Reply