• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Pratap Sarnaik : 39 कोटींचं टेंडर 160 कोटींवर नेलं, भाजप आमदाराचा मंत्री प्रताप सरनाईकांवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप

August 31, 2026 by admin Leave a Comment


मिरा-भाईंदरमध्ये भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी परिवहन मंत्र प्रताप सरनाईक यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे. भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहाच्या दुरावस्थेवरून दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाला. आता बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या वाढलेल्या खर्चावरून आमदार मेहता यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

बाळासाहेब ठाकरे कलादालन 39 कोटी रुपयांचं असताना खर्च हा 160 कोटी रुपयांवर कसा गेले, असा सवाल मेहता यांनी मंत्री सरनाईक यांना केला. 40 हजार चौरस फुटांच्या कलादालनासाठी इतका खर्च कसा झाला, याचं उत्तर जनतेला मिळालं पाहिजे, असा सवाल करत दोन्ही नेते आमनेसामने आले आहेत. एका दिवसाआधी लता मंगेशकर नाट्यगृहाचाच्या दुरावस्थेवरून मंत्री सरनाईक यांनी अनेक सवाल उपस्थित केले होते. त्यानंतर आता भाजप आमदार मेहता यांच्याकडून मंत्री प्रताप सरनाईक यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे बोलले जात आहे.

मिरा-भाईंदर पालिकेने कलादालनासाठी 39 कोटींचं टेंडर काढलं होतं. त्यानंतर या प्रकल्पाचा खर्च हा 160 कोटी रुपयांपर्यंत कसा पोहोचला, असा सवाल आमदार मेहता यांनी सरनाईकांना केला. आम्ही इतक्या पैशांमध्ये कलादालनाला चांदीचे पत्रे लावले असते, अशा शब्दात मेहता यांनी मंत्री सरनाईक यांच्यावर निशाणा साधला. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप मेहता यांनी केला. मेहता यांच्या विधानाने मिरा-भाईंदरमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

एका दिवसांपूर्वी लता मंगेशकर नाट्यगृहाच्या दुरावस्थेवरून मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजप आणि आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर टीका केली होती. तसेच त्यांनी महानगरपालिका प्रशासनावर आणि भाजपच्या कारभारावर टीका केली होती. मंत्री सरनाईक यांच्या टीकेनंतर आता मेहता यांनी बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या खर्चाचा मुद्दा काढत टीका केली. त्यांनी कलादालनाच्या कामात भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप केला. या आरोपामुळे मिरा-भाईंदरमध्ये सरनाईक विरुद्ध मेहता असा राजकीय वाद पेटलाय. आता आमदार मेहतांच्या आरोपांना मंत्री सरनाईक काय प्रत्युत्तर देतात, हे पाहावे लागेल.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भारत बांगलादेशच्या संबंधांवर थेट परिणाम, पुन्हा बांगलादेशने तेच केले, पाकिस्तानच्या नादाला लागून..
  • BCCI Rule: रोहित-विराटला खटकलं अन् बीसीसीआयने नियमच बदलला, 10 संघांना तातडीने आदेश दिला
  • Pratap Sarnaik : मंत्री प्रताप सरनाईक-नरेंद्र मेहता वाद पेटला; थेट राजीनाम्यावर प्रकरण पोहोचलं, कोण काय म्हणालं?
  • प्रचंड रोमँटिक गाणं, 100 वेळा ऐकूनही भरत नाही मन, 36 वर्षांपासून प्रेक्षकांचं प्रचंड आवडीचं
  • Mumbai News : केळी विकायला चाललेल्या मुंबईतील सुनीता मोरे मृत्यू प्रकरणाला नवीन वळण, फजुल रहमानने तिला दुकानात नेलं आणि..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in