• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मी बागेश्वर बाबा नाही, पण…; नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांना उद्देशून असे का म्हणाले?

August 8, 2026 by admin Leave a Comment


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आयआयटी दिल्लीच्या 57 व्या दीक्षांत समारंभाला हजेरी लावली. पंतप्रधान मोदींनी सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना पुढील भविष्यांसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कामना केल्या. पंतप्रधान मोदींनी या कार्यक्रमात एक जोक देखील सांगितला. त्यानंतर कार्यक्रमात एकच हशा पिकला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना महणाले, ‘तुमच्या मनात काही ना काही चालू असेल. हसत हसत म्हणाले, मी बागेश्वर बाबा नाही. पण काही ना काही चालू असेल. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात भविष्याविषयी वेगवेगळं चित्र असतं. अनेक मित्रांना पहिल्या स्टार्टअपचं स्वप्न असेल. तर काहींना आगामी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली असेल. खरंतर प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांचं स्वप्न वेगळं असतं. यात एक गोष्ट अशी आहे की, सर्वांच्या मनात एकसारखी आहे. तुमचा आयआयटी दिल्लीत पहिला दिवस होता. त्यावेळी आठवण करा. आजच्या दिवसाचं स्मरण करा. तुम्ही विचार करत असालच की, ही कालचीच गोष्ट आहे, ओरिएन्टेशन झालं. आता कन्वोकेशन होतंय. तुम्हाला समाधान होत असेल. तुमच्या जीवनाच्या नव्या अध्यायाचा उत्साह असेल. त्यामुळे आजचा क्षण जगून घ्यावं’.

‘तुमच्यावर येणार्‍या काळात जबादाऱ्या वाढणार आहेत. तेव्हा येथील जुन्या आठवणी तुम्हाला जुन्या काळात घेऊन जातील. या आठवणी तुम्हाला एनर्जेटिक करतील. प्रत्येक हॉस्टेलच्या आठवणी राहतील. तुम्हाला कुमाऊ, आरा, कारा..बिंडी, नील, कैलास, हिमाद्री, इंटर हॉस्टेल कॉम्पिटेशन किस्से , जुने तंटे अनेकांच्या लक्षात राहतील. तुम्ही पुन्हा त्याचं स्मरण करावे. ही केवळ शिक्षणाची गोष्ट नव्हे, असेही त्यांनी पुढे सांगितले.

 

#WATCH | IIT Delhi’s 57th Convocation Ceremony | Prime Minister Narendra Modi says, “… Somewhere in the back of your minds, something else might be going on. I am not Baba Bageshwar, but surely, thoughts are running through every student’s mind. Each of you likely holds a… pic.twitter.com/9R9ebCb5SP

— ANI (@ANI) August 8, 2026

‘आता वेळ निघायचा झाला आहे. तुम्हाला कँटिनच्या पराठ्याची आठवण होत असेल. तुमच्यापैकी अनेकांना आणखी काही क्षण घालवायचा असेल. या भावुक क्षणी मी एक गोष्ट सांगेल. तुम्ही जीवनात मागे वळून पाहण्याची संधी देईल. तेव्हा कॅम्पस लाइफ, तुमचे मित्र, शिक्षक, मेंटॉर आणि स्टाफ कुटुंब बनलंय. तुमच्या प्रोफेसरने आकार दिलाय. तुमचं कॅम्पस हळूहळू तुमचं घर बनलंय. तुम्ही यशात या सर्वांची आठवण कराल. सर्वांबाबत कृतज्ञ व्हाल. विसरून जाऊ नका, असेही त्यांनी सांगितले.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शुटिंग दरम्यान न्यूड फुटेज कॅमेऱ्यात कैद, मानसिक तणावात अभिनेत्री, 21 व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल
  • Kisses on Car : गर्लफ्रेंडला कारवर 4 तासात 3400 वेळा किस करायला लावणं आदित्यला चांगलचं महाग पडलं, जे वाटलं नव्हतं ते घडलं
  • IND vs SL: फक्त फिल्डींगसाठी आला अन् चमत्कार करुन गेला, सर्फराज खान असं काही बोलला की श्रीलंकन बॅटर…Video Viral
  • यालाच म्हणतात मित्र, रशियाने भारताला दिले मोठे वचन, पुतिन यांचे थेट आश्वासन..
  • रोमँटिक सीनमध्ये त्याचा ताबा सुटला, नको तिथे चुकीचा स्पर्श केला; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in