• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

माळशेज घाटात वादळी वाऱ्याचा थरार, अनेक दुचाकी रस्त्यावर कोसळल्या; VIDEO पाहून अंगावर येईल काटा

July 15, 2026 by admin Leave a Comment


राज्याच्या वातावरणात गेल्या काही दिवसांपासून बदल झाला आहे. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा कहर पहायला मिळाला होता. मात्र आता अनेक भागात कोरडे हवामान पहायला मिळत आहे. काही भागात वादळी वारेही पहायला मिळत आहे. या वादळी वाऱ्यामुळे माळशेज घाटात अनेकांची दैना उडाल्याचे समोर आले आहे. माळशेज घाटातील एक व्हिडिओ समोर आला आहे, यात वेगवान वाऱ्यामुळे काही दुचाकी रस्त्यावर कोसळल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

माळशेज घाटात वाऱ्याचा कहर

माळशेज घाट हा निसर्गसौंदर्याने नटलेला आहे, पावसाळ्यात धबधबे आणि निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक माळशेज घाटाकडे धाव घेतात. मात्र, याच घाटातून आता एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. घाटातील एका वळणावर सोसाट्याच्या वाऱ्याचा वेग इतका प्रचंड आहे की, चालत्या दुचाकी अक्षरशः रस्त्यावर कोसळताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे.

दुचाकीस्वारांची उडाली भंबेरी

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये माळशेज घाटातील बोगद्याजवळील धोकादायक वळण स्पष्टपणे दिसत आहे. या ठिकाणी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड आहे की, दुचाकीस्वारांना वाहनावर नियंत्रण ठेवणे अशक्य होत आहे. अनेक दुचाकीस्वार अचानक आलेल्या वाऱ्याच्या झोतामुळे रस्त्यावर पडताना दिसत आहेत. काहींना उभे राहणेही कठीण जात असून, स्थानिक नागरिक आणि इतर पर्यटक तातडीने मदतीसाठी धावत येऊन दुचाकीस्वारांना सावरताना आणि वाहने उभी करण्यास मदत करताना दिसत आहेत.

माळशेज घाटातील वाऱ्याचा व्हिडिओ समोर

माळशेज घाटात वादळी वाऱ्याचा थरार, अनेक दुचाकी रस्त्यावर कोसळल्या; VIDEO पाहून अंगावर येईल काटा #malshej #malshejghat #malshejvideo pic.twitter.com/fumcSPRiAM

— TV9 Marathi (@TV9Marathi) July 15, 2026

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

माळशेज घाटात अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे प्रवाशांची धावपळ उडाली. घाटाच्या टोकावरील बोगद्याजवळ अनेक मोटारसायकली वाऱ्याच्या जोराने रस्त्यावर पडल्या. कल्याणहून नगरच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वारांना वाऱ्याचा मोठा फटका बसला. या वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की पादचाऱ्यांना उभेही रहायला जमले नाही, त्यांना जमिनीचा आधार घ्यावा लागला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर अपघाताची घटना घडली नाही. मात्र या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

 





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कार्यक्रमाबाबत ठाम राहणं संजय जाधवांची खूप मोठी चूक, आता… मनोज जरांगे मुंबईत बदला घेणार?
  • माझ्यावरही 75 लाखांचं कर्ज, 750 मध्ये मांडवली होईल का? बड्या उद्योगपतीच्या कर्ज सेटलमेंटवर मराठी अभिनेत्याची खोचक पोस्ट
  • ऑफिसमध्ये त्रासदायक सहकाऱ्यांची मने कशी जिंकायची? काय सांगतात आचार्य चाणत्य…
  • शिंदे येतात तरी कशाला गद्दार लोकांचे मेळावे घेण्यासाठी… अंबादास दानवे यांची टीका..
  • निक्की तांबोळी-अरबाज पटेल यांच्या नात्यात दुरावा? सोशल मीडियावरील पोस्टने एकच खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in