• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शिंदे येतात तरी कशाला गद्दार लोकांचे मेळावे घेण्यासाठी… अंबादास दानवे यांची टीका..

August 30, 2026 by admin Leave a Comment


मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांना मोठा इशारा दिला. यासोबतच त्यांनी म्हटले की, आता गुंड बंडू जाधवचे काही खरे नाही. परभणीत होणारा शेतकरी मेळाला रद्द करण्याचा इशारा जरांगे यांनी दिला. दुसरीकडे बंडू जाधव यांनी स्पष्ट केले की, मेळावा रद्द होणार नाही, लोक समजले आहेत. रात्री सांगितले असते तर रद्दही केला असता. यावर आता अंबादास दानवे यांनी मोठे विधान केले. अंबादास दानवे यांनी म्हटले की, मराठा आरक्षणाबाबत जो लढा मनोज जरांगे पाटील यांनी उभा केला आहे तो निर्णायक स्तरावर आहे. एकनाथ शिंदे आज मराठवाड्यात येत आहेत, याच एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईला येऊन मनोज जरांगे यांची भेट घेऊन अध्यादेश दिला होता आणि मोठा गुलाल उधळला होता.

त्याचं काय झालं आहे, त्याचं काहीही झालेलं नाही.  OBC च प्रमाणपत्र प्रचलित पद्धतीने मिळत. मात्र हैदराबाद गॅजेटची घोषणा केली. मात्र, त्याची अजूनही अंमलबजावणी झाली नाही, गावगाव नोंदी आहेत. नोंदी आहेत. मात्र, सरकार दरबारी त्याची SOP नाही. हैदराबाद संस्थान समजा 1948 ला खालसा झालं, त्याच्या आधी जे जे निजामाच्या राज्यात मराठा होते त्यांची नोंद कुणबी म्हणून आहे. मात्र सरकारने कोणते प्रयत्न केले नाही.

मनोज जरांगे यांचा राग हा नैसर्गिक आहे, कारण सत्तेवर बसणारे हे लोक जातीचा फायदा उचलतात, खोट्या गोष्टी करतात आणि खोट्या लोकांना साथ देतात. भारतीय जनता पार्टीच्या लोकांना हे करायचं नाही खोट्या लोकांना साथ देतात म्हणून जरांगे पाटलांचा राग व्यक्त केला मला वाटते हा योग्य आहे. पुढे अंबादास दानवे यांनी म्हटले की, मनोज जरांगे यांनी काही जाणं गरजेचं नाही ते उपोषणाला बसलेले आहेत, बाकीचे लोक आहेत, त्यांनी सांगितल्यावर सगळं काही काम करणारे लोक आहेत.

शिंदे येतात तरी कशाला गद्दार लोकांचे मेळावे घेण्यासाठी, राजकारण नंतर करा या विषयावर तुम्ही गोष्टी करता फडणवीस यांच्यावर दबाव आणा. शेतकऱ्याचा पोरगा आहे, हे जे शेतकऱ्याचे आणि मराठ्याचे पोरं बसले आहेत. त्यासाठी तुम्ही देवेंद्र फडणवीस बोला केंद्राला बोला. अमित शहा, नरेंद्र मोदी यांना बोला तुम्ही रोज जाता मला वाटते तुम्ही याच्यासाठी जा एकदा.

एकनाथ शिंदेचा दौरा रद्द होईल का, असा सवाल अंबादास दानवे यांना विचारण्यात आला. यावर दानवे यांनी म्हटले की,  नाही झाला तर परिणाम भोगावे लागतील, त्यांनी रद्द केला पाहिजे, नाही म्हटलं तरी मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना मागच्या काळात प्रत्यक्ष हो अप्रत्यक्ष व त्यांच्या विषयी बोलले आहेत. हा मेळावा रद्द करावा अशी भूमिका म्हणून जरांगे पाटलांनी घेतली आहे मला वाटते ती योग्य आहे. मराठा समाज आंदोलनासाठी बसलेला असताना असे उत्सव साजरे करणे चुकीचे आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रक्षाबंधननंतर लगेच राखी काढली? जाणून घ्या राखी कधी सोडणं योग्य मानलं जातं…
  • वरलक्ष्मी व्रताचा शुभ दिवस, धनप्राप्तीसाठी करा ‘हे’ 3 सोपे उपाय
  • जरांगेंना बच्चू कडूंचा थेट फोन; शिंदेंच्या मेळाव्याबाबत नेमकं काय म्हणाले?
  • 4 कॅमेरे अन् 5000mAh बॅटरी; Samsung चा 5G फोन तब्बल 12 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या ऑफर किंमत
  • आरोग्य आणि चवीचा खजिना; घरी बनवा शुद्ध नारळाचे दूध,जाणून घ्या बनवण्याची सोपी रेसिपी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in