• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रक्षाबंधननंतर लगेच राखी काढली? जाणून घ्या राखी कधी सोडणं योग्य मानलं जातं…

August 30, 2026 by admin Leave a Comment


रक्षाबंधनच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीला कायम तिचं संरक्षण करण्याचं वचन देतो. पण रक्षाबंधन झाल्यानंतर राखी कधी सोडायची याबद्दल फार कोणाला माहिती नसेल, राखी सोडण्याचे देखील काही नियम आहेत. सांगायचं झालं तर, रक्षाबंधनचा पवित्र सण 28 ऑगस्ट 2026 रोजी देशभरात साजरा करण्यात आला. या दिवशी, बहिणी शुभ मुहूर्तावर आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी व सुखासाठी प्रार्थना करतात. राखी बांधताना जे नियम पाळले जातात, तसेच राखी सोडण्याचे देखील नियम आहेत. तर त्या नियमांबद्दल शास्त्रात काय सांगण्यात आलं आहे जाणून घ्या. सण संपताच राखी अचानक किंवा निष्काळजीपणे तोडू नये, तर काही कालावधीनंतर ती विधीपूर्वक काढली पाहिजे.

धार्मिक मान्यतेनुसार, रक्षाबंधननंतर लगेच राखी काढणं अशुभ मानलं जातं. रक्षाबंधन झाल्याननंतर किमान 24 तासांनीच राखी कढणं योग्य असतं. साधारणपणे, मनगटावर काही दिवस राखी बांधून ठेवणं शुभ मानलं जातं. काही भागांमध्ये आणि कुटुंबांमध्ये, रक्षाबंधनानंतर 3 ते 5 दिवस मनगटावर राखी ठेवण्याची परंपरा आहे, त्यानंतर ती काढता येते. इतर प्रचलित समजुतींनुसार, श्रीकृष्ण जन्माष्टमीपर्यंत राखी बांधून ठेवावी आणि जन्माष्टमीच्या दिवशी पूजा-अर्चा केल्यानंतरच ती मनगटावरून काढणे सर्वोत्तम मानलं जातं.

राखी काढल्यानंतरही काही पवित्र गोष्टींचे पालन करणं अत्यावश्यक आहे. राखी कधीही कचरापेटीत किंवा घाणेरड्या जागी फेकू नका. राखी हा केवळ एक धागा नसून एक पवित्र ‘रक्षासूत्र’ आहे आणि त्याला दैवी महत्त्व आहे. म्हणून, काढलेली राखी शुद्ध वाहत्या पाण्यात विसर्जित करावी किंवा घरातील पवित्र ठिकाणी ठेवावी.

जर राखी अचानक तुटली किंवा तिचे तुकडे झाले, तर ती पिंपळ किंवा वडाच्या झाडासारख्या पवित्र झाडाच्या मुळाजवळ जमिनीत पुरली पाहिजे. ज्योतिषांच्या मते, जन्माष्टमीनंतर वर्षभर राखी बांधून ठेवल्याने ती अपवित्र होते आणि हानी होण्याचा धोका असतो, म्हणून ती वेळेवर विधीपूर्वक काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही…)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tata च्या कार खरेदीची मोठी संधी, Curvv ते Harrier EV पर्यंत मिळतोय 3.35 लाखांपर्यंत डिस्काउंट
  • Vaibhav Sooryavanshi: नाद करतो काय! कॅप्टन्सी मिळताच वैभवचा मैदानात धुरळा, थेट अंपायरला खोटं ठरवलं, Video Viral
  • या खास तारखांना जन्मलेले लोकं असतात जिद्दी, कोणत्याही परिस्थितीत मिळवतात यश
  • टॉवेल वापताना कोणती काळजी घ्याल, किती वेळा स्वच्छ पाण्यात धुवाल…
  • मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in