• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ऑफिसमध्ये त्रासदायक सहकाऱ्यांची मने कशी जिंकायची? काय सांगतात आचार्य चाणत्य…

August 30, 2026 by admin Leave a Comment


आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतिमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहे. मुलांनी कसं राहिलं पाहिजे. समाजात वावरताना कसं राहिलं पाहिजे. स्त्रीयांनी पुरुषांनी कसं राहिलं पाहीजे, एवढंच नाही तर, ऑफिसमध्ये एखाद्या त्रासदायक सहकाऱ्याचं मन कसं जिंकायचं.. यावर चाणक्य यांनी अनेक महत्त्वाचं सल्ले दिले आहेत. सांगायचं झालं तर, आचार्य चाणक्य एक महान विद्वान आहेत. त्यांनी २३०० वर्षांपूर्वी कार्यालयीन राजकारणावर एक उत्तम विवेचन केलं होतं. तर जाणून घ्या आचार्य चाणक्य यांनी काय सांगितलं आहे…

सर्वात महत्त्वाचं म्हणजे,साम, दाम, भेद, दंड हे चाणक्याचे प्रसिद्ध सूत्र आहे. असं म्हटलं जातं की, ज्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे कठीण आहे, त्याच्याशी प्रथम सौम्य बोलावं, म्हणजेच शब्दांनी मन वळवावं. जर ते शक्य नसेल, तर थोडी मदत करून त्याच्यापर्यंत पोहोचावं, असा सल्ला त्यांनी दिला. त्यानंतर, भेद म्हणजे, त्याची कमजोरी ओळखून त्याला वेगळं करणं, आणि शेवटी, अधिकाऱ्यांकडे त्याची तक्रार करणे किंवा त्याला दूर ठेवणं.

अनेकांना माहिती नसतं पण, बाहेरील शत्रूपेक्षा आतला शत्रू अधिक धोकादायक असतो. अंतर्गत संघर्षाबद्दल त माहिती देण्यात आली आहे. चाणक्य म्हणतात की, जी व्यक्ती कार्यालयात तुमच्या शेजारी बसून तुमच्याशी चांगलं वागण्याचं नाटक करते, पण तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट बोलते, तोच खरा शत्रू असतो. तुम्ही अशा लोकांना तुमच्या योजना आणि गुपिते सांगू नयेत, तुम्ही तुमच्या तोंडावर ताबा ठेवावा.

चाणक्य म्हणतात की सापाशी मैत्री करणे चांगले आहे, पण त्याच्यासोबत एकत्र राहू नये. म्हणजेच, दुष्ट व्यक्तीशीही वैर ठेवू नये. हसतमुख राहा, पण विश्वास ठेवू नका. कार्यालयात तुम्हाला न आवडणारी व्यक्ती असली तरी, सर्वांसमोर भांडू नका. आपले काम करा आणि व्यावसायिक राहा, असे ते सांगतात.

तुमचं काम बोललं पाहिजे, तुम्ही नाही. चाणक्य हेच सांगत आहेत की राजाची ओळख त्याच्या कामामुळे झाली पाहिजे, पण तुमची ओळख तुमच्या युक्तिवादांमुळे होऊ नये. जे तुम्हाला त्रास देतात, ज्यांना तुमचे काम आवडत नाही, जे तुम्हाला चिरडून टाकू पाहतात, त्यांच्यासमोर युक्तिवादाचा आधार घेऊ नका, असं चाणक्य म्हणाले. कामाचा दर्जा महत्त्वाचा आहे, तुमच्या कामाचा दर्जा आणि परिणामच तुम्हाला वाचवेल.

चाणक्य सर्वात शेवटी म्हणाले, “तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजं की तुम्ही प्रत्येकाला बदलू शकत नाही. पण जेव्हा तुम्हाला एखाद्यासोबत कसं राहायचं हे कळतं, तेव्हा कोणीही तुम्हाला त्रास देऊ शकत नाही,” असं चाणक्य म्हणाले.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या, इलेक्ट्रीक गाड्या बऱ्या! आता 1 लाखात येणार नवी स्कूटर
  • ‘आई कुठे काय करते’मधील अभिनेत्रीचा मोडला संसार, घटस्फोटाच्या चर्चांवर पहिल्यांदाच स्वत: दिली माहिती
  • काँग्रेस कार्यकर्ते आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची हाणमारी; नेमकं काय घडलं?
  • खडसेंच्या 75 व्या वाढदिवसाचा अमृत सोहळा; शरद पवारांची विशेष उपस्थिती
  • ‘फँड्री’मधील शालूच्या हॉट लुकने वेधलं सर्वांचं लक्ष, हिरव्या साडीमध्ये दिल्या जबरदस्त पोज, फोटो चर्चेत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in