• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मारेकऱ्यांच्या तोंडी एकच नाव, विलास घुले प्रकरणात हादरवून टाकणारे पुरावे, रमेश घुले सगळं बाहेर काढणार!

June 24, 2026 by admin Leave a Comment


Vilas Ghule Case : बीड जिल्ह्यातील केच तालुक्यात विलास घुले या तरुण हॉटेल मालकाची निर्घृण हत्या झाली. भांडण मिटवण्यासाठी गेलेला असताना त्यांच्यावर हल्ला झाला होता. आता या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. आमदार धनंजय मुंडे यांनी हे प्रकरण थेट विधिमंडळात उपस्थित केल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे खासदार बजरंग सोनवणे यांच्या पुत्राचे नाव या प्रकरणात घेतले जात असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली जात आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच आता मयत विलास घुले यांचे बंधू रमेश घुले यांनी समोर येत खळबळजनक आरोप केले आहेत. त्यांनी बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे यांचे नाव घेतल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

उद्या मी हे नंबर पोलिसांना देणार

टीव्ही 9 मराठीने रमेश घुले यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विलास घुले हत्या प्रकरणी अनेक दावे केले आहेत. या प्रकरणात काल रात्री (23 जून) एफआयर दाखल करुन घेण्यात आला आहे. या हत्येची कसून चौकशी करावी, अशी मागणी रमेश घुले यांनी केली आहे. माझ्याकडे काही नंबर आहेत. माझ्या भावाची राख सावडण्याचा कार्यक्रम झाला की उद्या मी हे नंबर पोलिसांना देणार आहे, असं ते म्हणाले आहेत.

माझ्या हॉटेलवर येऊन…

सोबतच माझ्या भावाच्या हत्या प्रकरणात मकोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल व्हायला हवा. माझा भाऊ गेला आहे. माझ्या भावाला न्याय मिळाला पाहीजे. संगनमत करुन माझ्या हॉटेलवर येऊन हा हल्ला करण्यात आला आहे, असा दावा त्यांनी केला. तसेच पुढे बोलताना मारहाण करणारे सौरव सोणवणे यांचे नाव घेत होते, असा खळबळजनक दावाही रमेश घुले यांनी केला आहे.

माझ्या भावाला अडवून चाकूने मारलं

माझ्याकडे गोपनीय माहिती आहे. ती माहिती मी पोलिसांना देणार आहे. सीसीटीव्ही येणार आहेत तेही पोलिसांना देणार आहे. या प्रकरणाची सुनावणी फास्टट्रॅक कोर्टात घेऊन लवकरात-लवकर दोषींना फाशीची शिक्षा व्हायला हवी. मी आहे मारा, माझं कोणी काही करू शकत नाही, असा फोन झाला. तो फोन सौरव सोनवणेचा होता. तपासात सर्व काही 100 टक्के निष्पन्न होईल. थार, ब्लॅक स्कॉर्पिओ गाड्या घेऊन सगळे लोकं आले होते. माझ्या भावाला अडवून चाकूने मारलं आहे, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी मला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, आता बजरंग सोनवणे यांच्या पुत्राचे नाव या प्रकरणात आल्यानंतर पुढे काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Photos : पाकिस्तानी महिला क्रिकेटरची हवा, सौंदर्याचे जगभर दिवाने, फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात!
  • 99 टक्के लोकांनी हा जीव ओळखलाच नाही, सर्वच म्हणाले, साप.. पण नाही, तुम्ही तरी ओळखू शकता काय?
  • तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
  • टीम इंडियात वैभव सूर्यवंशीला कपडे बदलण्यासाठी मिळणार स्पेशल रूम! असं करण्याचं कारण समजून घ्या
  • Ketan Agarwal Case: 5 स्टार हॉटेलचे 70 रुम बुक, बर्थडेची जंगी तयारी पण…केतन अग्रवाल प्रकरणातील मोठी अपडेट समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in