• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मानसरोवरसाठी गेलेल्या 80 पर्यटकांपैकी चौघांशीच संपर्क, गिरीश महाजन यांचं नागरिकांना आवाहन काय?

August 27, 2026 by admin Leave a Comment


नेपाळमध्ये आलेल्या जलप्रलयात 160 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण बेपत्ता झाले आहेत. नेपाळच्या इतिहासातील हा सर्वात मोठा जलप्रलय असल्याचं सांगितलं जात आहे. पाऊस नसतानाही तिबेटमधून आलेल्या पुराच्या पाण्यामुळे येथील घरेदारे, इमारती, पूल, टॉवर आणि गावच्या गावच वाहून गेली आहेत. माणसं आणि जनावरंही पाण्याबरोबर गडप झाली आहेत. त्यामुळे नेपाळमध्ये हाहा:कार उडाला आहे. नेपाळच्या मानसरोवरसाठी भारतातूनही अनेक पर्यटक गेले होते. महाराष्ट्रातून 80 पर्यटक गेले होते. त्यातील अनेक पर्यटक वेगवेगळ्या राज्यातील आहेत. मात्र, या पर्यटकांपैकी फक्त चारच पर्यटकांशी संपर्क झाला असल्याचं राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. तसेच, तुमचे नातेवाईक, शेजारी किंवा ओळखीचे कोणी नेपाळला गेले असतील तर आमच्याशी संपर्क करा. आम्ही त्या लोकांचा शोध घेऊ, असं आवाहन महाजन यांनी केलं आहे.

मंत्री गिरीश महाजन यांनी मीडियाशी संवाद साधताना हे आवाहन केलं आहे. नेपाळमध्ये ग्लेशियर तुटल्याने नद्यांना महापूर आला. या महापुरामुळे गावं विदारक परिस्थितीत वाहून गेली आहेत. मानसरोवरलाही मोठा पूर आला. आपले काही पर्यटक तिकडे गेले आहेत. रिचा टूर ट्रॅव्हल्सच्या दोन गाड्यांमधून पर्यटक मानसरोवरला गेले. 80 पैकी चार जणांशी संपर्क झाला आहे. माझ्या शेजारचं कुटुंबही पाच सहा दिवसापूर्वी नेपाळला गेलं होतं. मी लगेच त्यांच्याशी संपर्क केला. त्यांच्या गाडीत 37 लोक आहेत. ते सर्व कुठले आहेत ते माहीत नाही. काही आंध्र प्रदेशातील आणि दक्षिणेकडील आहेत. महाराष्ट्रातील किती लोक त्यात आहेत हे समजू शकलं नाही, असं गिरीश महाजन म्हणाले.

24 तास अलर्ट मोडवर

माझ्या शेजारच्या लोकांशी माझा संपर्क झाला होता. त्यानंतर मी आज परत सकाळपासून त्यांच्याशी संपर्क करतोय. तो होत नाही. ते प्रदक्षिणा करत आहेत. या आधी त्या चार जणांशी संपर्क झाला होता. ते सुखरूप आहेत. अजून किती लोक अडकलेत याची आम्ही माहिती घेत आहोत. जिल्हाधिकाऱ्यांनाही माहिती घेण्यास सांगितलं आहे. वेबसाईटही खुली केली आहे. कुणाकडे काही माहिती असेल तर कळवा. दिल्लीशी संपर्क सुरू आहे. आम्ही सर्वजण 24 तास अलर्ट मोडवर आहोत. कुणाला काही माहिती मिळाली तर आमच्याशी संपर्क करा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

नेपाळ सरकारच्या संपर्कात

आम्ही नेपाळ सरकारशीही संपर्क साधून आहोत. पंतप्रधानही त्यात लक्ष घालून आहोत. आम्ही माहिती घेतच आहोत. कुणाकडे माहिती असेल तर सांगा. 80 पैकी चार लोकांशी संपर्क झाला. केंद्र आणि राज्य अलर्ट मोडवर आहे. आम्ही लोकांना इतरांची माहिती विचारत आहोत. आम्हाला कळवा. जिल्हाधिकाऱ्यांना कळवा. तुमच्या आजूबाजूचे, नातेवाईक किंवा ओळखीचे कोणी गेले असतील तर तात्काळ कळवा. म्हणजे शोध घेता येईल, असंही ते म्हणाले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Floods : शौचालयासाठी खड्डा खणत होता, तितक्यात पुराने त्याला गिळलचं होतं, पण..देव तारी त्याला कोण मारी
  • Abhijeet Dipke: आता तुझी पाळी आहे, तयारीत राहा…अभिजीत दिपके यांनी कोणाला दिली वॉर्निंग?
  • MPSC पेपरफुटीवरून राजकारण पेटलं; भाजप नेत्याचं थेट रोहित पवारांना ओपन चॅलेंज, म्हणाले, ‘हिंमत असेल तर….’
  • मोदींचा युवा खेळाडूंना खास संदेश; 2036 ऑलिम्पिकसाठी भारत मोठ्या तयारीत, आता…
  • Nepal Flood: 4000 फूट खाली कोसळला 2 हजार फूट रुंद बर्फाचा डोंगर; नेपाळच्या महाप्रलयाची Inside Story

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in