• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मातोश्रीसमोर अजून मोठं आव्हान… एकनाथ शिंदेंचा मास्टर प्लॅन… कलानगरच नाही दादरमध्ये मोठी शोधाशोध

June 23, 2026 by admin Leave a Comment


शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले आणि काल त्यांनी शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला. खासदारांच्या या फुटीमुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला असतानाचा आता आणखी मोठी अपडेट समोर आली आहे. मातोश्रीसमोर आणखी एक आव्हान उभं राहू शकतं. शिवसेना शिंदे गटाचा विस्तार होत असतानाच आता एकनाथ शिंदे हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते. मुंबईत आता शिंदेंच्या शिवसेनेचं नवीन “सेनाभवन” उभं राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नवीन “सेनाभवना”साठी शिंदेंच्या शिवसेनेकडून जागांची शोधाशोध सुरू असल्याचेही सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता मुंबईत आणखी एक शिवसेना भवन उभं राहू शकतं. एकीकडे खासदारांची पळवापळी, कार्यकर्ते, पदाधिकारी याचं आऊटगोई्ंग सुरू असतानाचा आता सेनाभवनच्या रुपाने मातोश्रीसाठी, ठाकरे गटासाठी हे मोठं आव्हान ठरू शकतं.

“सेनाभवना”साठी जागेची शोधाशोध सुरू

साधारण 4 वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी उठाव केला आणि अनेक आमदारांसह बाहेर पडत त्यांनी ठाकरेंची साथ सोडली. शिवसेना शिंदे गट निर्माण झाला अन् तेव्हापासून आत्तापर्यंत विविध पक्षांचे आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते वेळोवेळी शिवसेना शिंदे गटात सामील झाले. शिवसेना शिंदेगटाकडून आता राज्यभरात शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे आता पक्षासाठी “मुख्यालय” असणे गरजेचं आहे. यासाठी शिवसेना भवनाच्या धर्तीवर ,शिॅदेंच्या शिवसेनेकडून नव्या सेनाभवनासाठी जागांची पाहणी सुरू केली आहे.

त्यासाठी मुंबईतच दोन जागा पाहण्यात आल्या असून त्यातील ऐक जागा ही वांद्रे बीकेसीतील असून ही जागा ठाकरेंच्या ‘मातोश्री’हून अगदी काही अंतरावर असल्याचे समजते. तर दुसरी जागा ही दादरमध्ये पाहण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कुठे होणार सेनाभवन ?

सेाभवनसाठी या दोन्ही जागांची पाहणी करण्यात आली आहे. मात्र शिवसेना हा मराठी माणसाच्या हक्कासाठी स्थापन करण्यात आलेला पक्ष आहे. त्यामुळेच जिथे अनेक विविध कंपन्यांची कॉर्पोरेट कार्यालयं आहेत, अशी बीकेसीधून शिवसेनेचं कार्यालय चालवता येणार नाही. म्हणूनच दादरसारख्या मराठमोळ्या परिसरातच शिवसेना भवन असायला हवे अशी एकनाथ शिंदे यांची इच्छा असल्याचे समजते. त्याच पार्श्वभूमीवर दादरमधील जागेची चाचपणी करण्यात आली असून लवकरच ती निश्चित होईल असं कळतं. मात्र तिथेही काही त्रुटी असून त्यावर पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे, अशी माहिती समोर आली आहे.

राज्यभरात एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने पक्षाचा विस्तार करत आहेत, ते पाहता मुंबईतही पक्षाचे हक्काचे कार्यालय असणे गरजेचे आहे. शिवाय मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळेच मुंबई हातात ठेवण्यासाठी शिंदेंकडून मुंबईत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील. मात्र त्यासाठी पक्षाचे मध्यवर्ती कार्यालयही असणे गरजेचे असल्याने नव्या सेनाभवनासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नेपाळ महाप्रलयाबाबत थक्क करणारी अपडेट; पाऊण तास उशीरा दिली माहिती, चीनच्या मनात नेमकं काय होतं?
  • Nepal Flood: चीन तिथे पोहोचला जिथून महाप्रलय सुरू झाला, नेमकं काय घडलं?
  • Khawdya Dongar: कुणालची फक्त एकच मागणी होती, पण मुरलीकाका… अखेर बहिणीने बोलून दाखवलं माहित नसलेले सत्य
  • Nepal Floods : नेपाळच्या महाप्रलयातील थरकाप उडवणारा इमिग्रेशन सेंटरचा VIDEO, सद्गुरुंचे 77 अनुयायी कुठे?
  • झोप उडवणारी बातमी… नेपाळमध्ये पुन्हा महाजलप्रलय? 47 हिमनद्या वितळण्याचा धोका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in