• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Nepal Floods : नेपाळच्या महाप्रलयातील थरकाप उडवणारा इमिग्रेशन सेंटरचा VIDEO, सद्गुरुंचे 77 अनुयायी कुठे?

August 27, 2026 by admin Leave a Comment


Nepal Flash Flood Jaggi Vasudev : नेपाळमध्ये सध्या हाहाकार माजला आहे. 26 ऑगस्टच्या सकाळी नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला. या विध्वंसानंतर अशी माहिती देखील समोर येत आहे की, सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या ‘ईशा फाउंडेशन’शी संबंधित किमान 77 यात्रेकरू बेपत्ता झाले आहेत. हे यात्रेकरू कैलास मानसरोवर यात्रेवरून परतत होते आणि अचानक पूर आला तेव्हा ते तिबेटमधील ग्यिरोंग येथील इमिग्रेशन सेंटरमध्ये होते. सद्गुरु यांनी एका ऑनलाइन पोस्टद्वारे या घटनेबद्दल सांगितलं.

कैलास यात्रेसाठी गेलेल्या 105 भारतीय भाविकांपैकी 77 जण बेपत्ता असल्याची शक्यता

नेपाळ पर्यटन मंडळाने बेपत्ता घोषित केलेल्या 105 भारतीय कैलास यात्रेकरूंपैकीच हे 77 जण आहेत, जे सध्या ‘ग्यिरोंग’ येथील इमिग्रेशन कार्यालयात आहेत असं मानलं जात आहे. नेपाळ पर्यटन मंडळाच्या रिपोर्टनुसार, पूरग्रस्त भागात किमान 384 यात्रेकरूंशी संपर्क तुटला. यात 291 परदेशी नागरिक आणि 93 नेपाळी नागरिकांचा समावेश आहे. परिणामी, पुरामुळे मोठ्या संख्येने प्रवाशांशी संपर्क तुटल्याने त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.

 

Ariel view CHINA–NEPAL Customs pic.twitter.com/3ZXttK2JP6

— I Love Siliguri (@ILoveSiliguri) August 26, 2026

 

कैलास यात्रेवरून 495 जण सुरक्षित परतले

सद्गुरुंनी दिलेल्या माहितीनुसार, या तीर्थयात्रेत सहभागी असलेल्या 21 गटांमधील एकूण 495 लोक सुरक्षितपणे परतले आहेत. दरम्यान, 743 लोक तिबेटमध्ये, तर 148 लोक नेपाळमध्ये आहेत. सद्गुरूंनी असं देखील सांगितलं आहे की, त्यांचे तीन स्वयंसेवक सध्या नेपाळमधील तिमुरे येथे आहेत. या आकडेवारीवरून असे दिसून येते की, कैलास मानसरोवर यात्रेशी संबंधित अनेक लोक सध्या विविध ठिकाणी अडकले आहेत आणि त्यांच्याशी सुरक्षित संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Monsoon: नेपाळमध्ये विध्वंसानंतर बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा कहर, IMD चा 26 राज्यांना अलर्ट, छत्री सोबत राहू द्या
  • सोनलची थेट तुलना केली सचिन तेंडुलकरशी! बीसीसीआय अधिकाऱ्याच्या पोस्टने वादाला फोडणी
  • जेवण करून आंदोलन करा… नरहरी झिरवळ यांचा अजब सल्ला; पत्रकारांनी घेरताच काढता पाय
  • दोन जणांनी गमावला जीव, विमानाचा तर अगदी चुरा झाला; कानपूरमध्ये विमानाचा भीषण अपघात
  • Nepal Floods : शौचालयासाठी खड्डा खणत होता, तितक्यात पुराने त्याला गिळलचं होतं, पण..देव तारी त्याला कोण मारी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in